Surat Bhusawal Railway Line Saam tv
महाराष्ट्र

Railway Update : अतिवृष्टीमुळे सूरत-भुसावळ रेल्वेसेवा अडखळली; मालगाडीची चाकं मातीत फसली! VIDEO

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यासह चिंचपाडा परीसरात रात्रीच्या सुमारास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. यामुळे सुरत- भुसावळ रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाचा बोजवरा उडाला आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: राज्यात हाहाकार माजविला असून रात्रीच्या सुमारास नवापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. सुरतहून भुसावळकडे जाणारी वाहतूक आज सकाळी बंद करण्यात आली होती. गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चिंचपाडा रेल्वे स्थानक परिसरात रुळावर पाणी व मातीचा भराव वाहून आल्याने यात मालवाहू गाडी अडकल्याने सुरत- भुसावळ रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नवापूर तालुक्यासह चिंचपाडा परीसरात रात्रीच्या सुमारास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. यामुळे सुरत- भुसावळ रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाचा बोजवरा उडाला आहे. कोळदे ते चिंचपाडा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर प्रचंड पाणी व रेल्वे रुळावर मातीचा भराव वाहून आला आहे. (Navapur) यामुळे चिंचपाडा रेल्वे स्थानकाजवळ मालवाहू रेल्वे गाडी रेल्वे रुळावर मातीमध्ये रुतली आहे. रुळावर वाहून आलेला मातीचा भराव काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे. 

चिंचपाडा रेल्वे स्थानकाजवळ महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या पुलाखाली रेल्वे मार्गाला कोणतीही संरक्षण भिंत नसल्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून आले. तसेच पाण्यासोबत मातीचा ढिगारा देखील वाहून आला आहे. त्यामुळे (Railway) रेल्वे रुळावर पाणी मोठ्या प्रमाणात साचले त्यासोबत रेल्वे रुळावर माती आल्याने रेल्वे रुळ माती खाली गेल्याने रेल्वे मालगाडी रेल्वे रुळावर चिंचपाडा गावाजवळ अडकल्याने सुरत भुसावळ रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी या मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या या विविध स्टेशनवर थांबून आहेत. गेल्या तीन ते चार तासांपासून रेल्वेची वाहतूक झाली आहे बंद आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT