Navapur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Navapur Crime News : महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्राची चोरी; नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन महिला ताब्यात

Nandurbar News महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्राची चोरी; नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन महिला ताब्यात

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे रविवारी आठवडी बाजारात महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरताना (Nandurbar) संशयित दोन महिला चोरट्यांना रंगेहात पकडल्याने बाजारात एकच खळबळ माजली. सतर्कतेने नागरिकांनी सदर चोरट्यांना पोलिसांच्या (Police) ताब्यात देण्यात आले असून रविवारी आठवडे बाजारात पोलीसांनी गस्त वाढवण्याची मागणीने पुन्हा जोर धरू लागली आहे. (Maharashtra News)

नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे रविवार दिवस म्हणजे आठवडी बाजाराचा दिवस असतो. तालुक्यातील महत्त्वाची व मोठी बाजारपेठ असल्यामुळे येथे मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील नागरीक, शेतकरी, मजूरवर्ग खरेदीसाठी व अन्य कामाच्या निमित्ताने येत असतात. बाजाराच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत चोरटे संधी साधत असतात. गेल्या वेळी मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता 

सध्या बाजारात स्थानिक (Navapur) महिलांच्या गळ्यापर्यंत चोरट्यांचा हात आला असून चक्क सोन्या चांदीचे दागिने लांबविण्याचे प्रयत्न संशयित चोरट्या महिला करतांना दिसून येत आहे. असेच गळ्यातील दागिने चोरताना दोन महिला सापडल्या आहेत. अशा घटनेमुळे बाजारातील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून चोरट्यांना खाकीचा धाक नसल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT