Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: डांबरीकरण रस्त्याचे वाजले तीन तेरा; ठेकेदारांना अभय कोणाचे, ग्रामस्‍थांचा संतप्‍त सवाल

डांबरीकरण रस्त्याचे वाजले तीन तेरा; ठेकेदारांना अभय कोणाचे, ग्रामस्‍थांचा संतप्‍त सवाल

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदूरबार : खड्डे में जाए जनता अपना काम बनता..अशीच प्रचिती नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर (Navapur) तालुक्यात विकास कामांच्या दरम्यान आली आहे. तालुक्यात विविध योजनेअंतर्गत विकास कामे केले जात आहे. रस्ता डांबरीकरणाचे काम निकृष्ट, दर्जाहीन व नियोजन शून्य कारभाराने सुरू (Nandurbar) असल्याचे दिसून येत आहे. संबंधित ठेकेदार, अभियंते कोणालाही जुमानायला तयार नाही. गावातील सरपंच, ग्रामस्थ यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. नवीन दर्जेदार रस्ता बनवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. (Live Marathi News)

नवापूर तालुक्यातील पळसून ते नवापाडा डांबरीकरण रस्त्याचे तीन तेरा वाजले आहे. संबंधित ठेकेदाराने कुठल्याही प्रकारचे डांबर न टाकता खडी टाकून दिली आहे. ही खडी पसरून मध्येच पायवाट पडली आहे. ठिकठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले आहेत. यातूनच ग्रामस्थ मार्गस्थ होताना दिसून येत आहे. या रस्त्यावरून मोटरसायकल देखील चालू शकत नाही. इतकी खराब अवस्था रस्त्याची झाली आहे. रस्त्याने मोटरसायकल गेल्यास घसरून पडण्याच्‍या भीतीने मोटरसायकलस्वारला आपल्या परिवाराला खाली उतरून भर (Rain) पावसात एक किलोमीटर अंतरापर्यंत पायी चालणे भाग पडले आहे.

रस्त्याच्या कडेला असलेल्या डांबरचा ड्रममध्ये पाणी साचल्याने डांबर पूर्णतः कडक झाले आहे. निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. भर पावसात नवापूर तालुक्यात सुरू असलेले डांबरीकरणाने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. संबंधित ठेकेदार मोठ्या प्रमाणात दर्जाहीन काम करत असले तरी संबंधित अभियंत्याचे यावर कुठलेही वचक नसल्याचे दिसून येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खराब डांबरीकरण कशा पद्धतीने होते. यावर नेमका कोणाचा आशीर्वाद आहे. यामागे काही अर्थकारण जोडले गेले आहे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT