Navapur News Saam tv
महाराष्ट्र

Navapur News : नवापूरमध्ये सराफ गल्लीतील घराला आग; दोघांना वाचविण्यात यश

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील सराफ गल्लीत कापड व्यापारी हरेशकुमार खेमचंद गोपालनी यांच्या घराला आग लागली.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नवापूर शहरातील सराफ गल्लीतील एका घराला अचानक आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. (Fire) आग लागली यावेळी परिवारातील काही सदस्य घरात होते. मात्र स्थानिक नागरिक लागलीच मदतीसाठी पोहचल्याने (Nandurbar) आगीतून दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. (Tajya Batmya)

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर (Navapur) शहरातील सराफ गल्लीत कापड व्यापारी हरेशकुमार खेमचंद गोपालनी यांच्या घराला आग लागली. आग लागलेल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर रेडिमेड कपड्यांचे गठ्ठे असल्याने आगीने लागलीच रौद्र रूप धारण केले. यामुळे परिसरात धावपळ उडाली होती. घराच्या खिडक्यांमधून धुराचे लोट निघाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. यानंतर आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दुसऱ्या मजल्यावर आग लागली असल्याने आटोक्यात आली नाही. दरम्यान अग्निशमन दलाला (Fire Brigade) आगीबाबत माहिती देण्यात आली. 


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगीतून दोन जणांना काढले बाहेर
घराला आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धगधगत्या आगीतून दोन जणांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले. तसेच घरातून दोन गॅस सिलेंडर रहिवाशीनी खाली उतरविल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान नागरिकांनी मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर अग्निशामक बंब दाखल झाले असून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या आगीत रेडीमेड कपडे जळून खाक मोठे नुकसान झाले असून स्थानिकांनी उर्वरित कपड्याचे गट्टे बाहेर काढले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT