Navapur Crime Saam tv
महाराष्ट्र

Navapur Crime : घरगुती वादातून पत्नीची हत्या; पती फरार, पोलिसात गुन्हा दाखल

Nandurbar News : २२ एप्रिलच्या रात्री देखील कोकिलाबाई व रंजीत यांच्यामध्ये वाद झाले. हा वाद विकोपाला जाऊन रागाच्या भारत रंजीत याने पत्नीवर धारदार शस्त्राने वार केला

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : परी- पत्नीमध्ये सतत वाद होत होते. या सततच्या होत असलेल्या वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार (Navapur) करत पत्नीचा खून केला. ही धक्कादायक घटना मरोड (ता. नवापूर)  येथे घडली. या प्रकरणी पोलिसात (Police) तक्रार दाखल करण्यात आली असून संशयित आरोपी पतीचा शोध घेण्यात येत आहे. (Live Marathi News)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील मरोड (ता. नवापूर) येथे हि घटना घडली असून कोकिलाबाई रंजीत पाडवी असे मृत महिलेचे नाव आहे. कोकिलाबाई व पती रंजित पाडवी हे गावात वास्तव्यास होते. दरम्यान (Crime News) संशयित रंजीत पाडवी (वय ५९) आणि त्याची पत्नी कोकिलाबाई यांच्यात सतत वाद होत होते. पती दारू पिऊन येत असल्याने अगदी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान २२ एप्रिलच्या रात्री देखील कोकिलाबाई व रंजीत यांच्यामध्ये वाद झाले. हा वाद विकोपाला जाऊन रागाच्या भारत रंजीत याने पत्नीवर धारदार शस्त्राने वार केला. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. दरम्यान कामजाभाई रमाभाई कोठवाड्या (वय.३८, रा गवाण, ता. उचछल जि.वापी, गुजरात) यांच्या माहितीवरून विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fort : किल्ला, समुद्र अन् हजारो फ्लेमिंगो; मुंबईतील 'या' ठिकाणाचं सौंदर्य मन मोहून टाकतं!

Diabetes Diet: डायबिटीजच्या रुग्णांसाठी 'ही' भाजी ठरू शकते फायदेशीर; ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी नक्की खा

Maharashtra News Live Update: धुळे सोलापूर महामार्गवर पुन्हा मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला

सत्ताधारी पक्षातील नेत्याची भररस्त्यात हत्या; कार्यालयात जाताना सहा जणांच्या टोळीने घेरलं अन्...

विंचू आणि साप चावण्यात नेमका काय फरक? पावसाळ्यात या घटना का वाढतात, जाणून घ्या महत्त्वाची माहिती!

SCROLL FOR NEXT