Nandurbar : महसुल विभाग विरुद्ध महावितरण कंपनी! वाचा काय आहे हे प्रकरण  SaamTvnews
महाराष्ट्र

Nandurbar : महसुल विभाग विरुद्ध महावितरण कंपनी! वाचा काय आहे हे प्रकरण

थकबाकीवरुन महावितरण आणि नंदुरबार तहसील कार्यालयात चांगलीच जुंपली आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : थकबाकीवरुन महावितरण आणि नंदुरबार तहसील कार्यालयात चांगलीच जुंपली आहे. वीज बिल थकीत असल्याने महावितरणाने तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा खंडीत केला तर तहसीलचे कामकाज ठप्प असल्याने महावितरणकडे महसूलची अकृषक थकबाकी असल्याने तहसीलदारांनी तात्काळ कारवाई करत चक्क महावितरणचे कार्यालयच सील करत प्रतिशॉक दिला.

या बाबत हा वाद जिल्हाधिकार्‍यांपर्यंत पोहचला असताना महसुल विभागाच्या कर्मचार्‍यांनी पुन्हा आष्टे सब स्टेशन सील करून महावितरण विभागाला आज दिवसभरातला दुसरा शॉक दिला आहे.

हे देखील पहा :

महसूल विभाग एवढ्यावरच न थांबता महावितरण विभागाच्या कोपरली येथील सब स्टेशन देखील सील करण्याच्या तयारीत आहे. नंदुरबार तहसील कार्यालयाकडे महावितरणचे सुमारे दीड लाख रुपये वीज बिल थकले होते. तहसील कार्यालयाला शॉक देत चक्क वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे तहसील कार्यालयातील काम ठप्प झाले.

यामुळे तहसिलदारांनी प्रतिशॉक देत महावितरण कंपनीच्या सबस्टेशन आणि कार्यालयांकडे थकीत असलेल्या सुमारे तीन लाख ४२ हजार रुपयांचा अकृषक भरणा का केला नाही अशी विचारणा करीत थेट नंदुरबार शहरातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले.

यामुळे महावितरण कंपनीचे कर्मचारी जिल्हाधिकार्‍यांकडे गेले सायंकाळी याबाबत बैठक आयोजीत करण्यात आली असतांना महसुल विभागाच्या कर्मचार्‍यांनी महावितरण कंपनीला पुन्हा शॉक देत आष्टे सब स्टेशन सील केले आहे. महसूल विभाग एवढ्यावरच न थांबता महावितरण विभागाच्या कोपरली येथील सब स्टेशन देखील सील करण्याच्या तयारीत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; १० तोळ्यामागे १५,३०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update : अशोक खरात प्रकरणी थोड्याच वेळात नाशिक न्यायालयात सुनावणी

Kapil Sharma: २० वर्षांच्या कारियरमध्ये केले फक्त ४ चित्रपट, एक हिट तीन फ्लॉप, तरीही आहे कोट्यवधींचा मालक

युद्ध भडकलं! इराणवर सर्वात मोठा हल्ला कधी होणार? ट्रम्प यांनी सांगितली तारीख

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरने जिगरी दोस्ताला केलं एप्रिल फूल; प्रँक पाहून मित्रानेही मारला डोक्यावर हात

SCROLL FOR NEXT