Nandurbar Lok Sabha Election 2024 Saam tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : नंदुरबार लोकसभेसाठी काँग्रेसचे गोवाल पाडवी; भाजप खासदार डॉ. हिना गावित यांच्याशी लढत

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र गेल्या दहा वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व राहिले आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपकडून उमेदवार जाही झाले असून काँग्रेसने (Congress) देखील आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरवात केली असून यात नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर केल्याने (Nandurbar) नंदुरबार लोकसभेसाठी भाजपचे खासदार डॉ. हिना गावित आणि काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्यात लढत होणार आहे. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र गेल्या दहा वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे (BJP) वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे खासदार हिना गावित (Hina Gavit) या गेल्या दहा वर्षापासून नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार आहेत. दरम्यान काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे नुकताच नंदुरबार जिल्ह्यात येऊन गेले आहेत. यानंतर काँग्रेसने जाहीर केलेल्या सात उमेदवारात नंदुरबार लोकसभेसाठी (Lok Sabha Election) गोवाल पाडवी यांचे नाव जाहीर केले आहे. यामुळे आता खासदार हिना गावित यांच्या विरोधात काँग्रेसचे नवीन उमेदवार गोवाल पाडवी यांचा आमना सामना पाहण्यास मिळणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाडवी प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात  

खासदार हिना गावित यांच्याकडे दहा वर्षाच्या राजकारणाच्या अनुभव आहे. तर काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. मात्र गोवाल पाडवी यांचे वडील के. सी. पाडवी गेल्या ३० वर्षापासून आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यामुळे हिना गावित यांना गोवाल पाडवी कशा पद्धतीने आव्हान देणार हे पाहणं आता महत्त्वाच्या ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT