नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकी घसरुन हा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. धडगाव तालुक्यातील जलसिंगपाडाजवळ दुचाकी घसरुन हा अपघात झाला आहे. विलास वडवी असं अपघातात मृत झालेल्या युवकाचं नाव आहे. सदर युवक हा सीसा येथे वास्तव्यास होता.
दुचाकीवरुन विलास वडवी आणि सचिन वसावे हे दोघं हिरो होंडा स्प्लेंडर या दुचाकीवरुन छापरी गावातून येत असताना हा अपघात झाला आहे. मोटरसायकल घसरल्याने विलास वळवी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सचिन वसावे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
यवतमाळमध्ये ८८ प्रवासी असलेल्या बसचा अपघात
यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील माणोली ते दहेगाव परिसरात किनवट एसटी बसचा आणि एका दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव एसटीने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात देखील दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, या एसटी बसमध्ये तब्बल ८८ प्रवासी प्रवास करत होते.
सदर एसटी बस किनवटवरुन घाटंजी मार्गे यवतमाळकडे येत होती. चालकाचं नियंत्रण सुटल्याने समोर चालणाऱ्या दुचाकीला एसटीने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. एसटीत तब्बल ८८ प्रवासी प्रवास करत होते. अपघातात मृत झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव नंदू चव्हाण असं असून तो जळका तालुक्यातील राळेगाव येथे वास्तव्यास होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.