Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी घेतला पुढाकार; नाला खोलीकरण कामाला वेग

Nandurbar News : डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटरच्यामाध्यमातून हरणखुरी गावांत सर्व नाल्यांचे खोलीकरण केले जाणार आहे. त्याच बरोबर संपूर्ण गावांत व्हट खोदकाम केले जाणार आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : मागील वर्षी पाऊस कमी आणि जलसंधारणाच्या कामाच्या अभावी यावर्षी गावाला पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागले आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटरच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायत भुजगावच्या पुढाकारातून नाला खोलीकरण कामाला सुरुवात झाली आहे.

डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटरच्यामाध्यमातून हरणखुरी गावांत सर्व नाल्यांचे खोलीकरण केले जाणार आहे. त्याच (Nandurbar) बरोबर संपूर्ण गावांत व्हट खोदकाम केले जाणार आहे. यावर्षी धडगाव तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईला (Water Scarcity) सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे तालुकाभरात जलसंधारणाच्या कामाची आवश्यकता आहे. परंतु जलसंधारणाच्या कामांचा वेग कमी असल्याने पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवत आहे. 

यंदा भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे. नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागली आहे. यामुळे यंदा जलसंधारणाची कामांतर्गत नाला खोलीकरण कामासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी धडगाव तालुक्यात गावागावांमध्ये जलसंधारणाच्या कामांचा वेग वाढवणे आवश्यकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत खळबळ! हायप्रोफाईल एरियात मॉडेलच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

IND T20 WC 2026: शनिवारी टी-२० वर्ल्डकपचा थरार! टीम इंडिया कोणासोबत करणार दोन हात, १५ शिलेदार कोणते, A टू Z माहिती एका क्लिकवर

Mumbai News: IIT बॉम्बेमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलच्या इमारतीवरून मारली उडी

Video Viral: रिलसाठी काहीपण!!! धावत्या लोकलमध्ये लटकत तरूणीचा स्टंट, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT