Nandurbar Devgoi Dahel road Eicher truck accident  Saam Tv News
महाराष्ट्र

Nandurbar Accident : यात्रेतून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, भरधाव बँडची गाडी उलटली; एकाचा दुर्दैवी मृत्यू

Nandurbar Eicher Truck Accident : बँडची गाडी उलटल्याने १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मोलगी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Prashant Patil

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील देवगोई ते दहेल रस्त्यादरम्यान एका आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. देव मोगरा मातेच्या यात्रेतून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. बँडची गाडी उलटल्याने १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मोलगी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातात बँड गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या चालकाविरोधात मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाशिवरात्रीला आक्रित घडलं

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी असाच एक भीषण अपघात घडला होता. महाशिवरात्री निमित्त भजनासाठी पहाटे अर्टीगा गाडीत पाच युवक जात असताना नंदुरबार शहरातील वीर महाराणा प्रताप ते खोडाई देवी मंदिर रस्त्यावर भरधाव वेगातील आर्टिगा गाडी विद्युत खांबावर आदळल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. अपघातात चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत आर्टिगा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT