Nandurbar Crime Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime : विरोधात जबाब दिल्याने जमावाचे भयानक कृत्य; साक्षीदार पती- पत्नीला मारहाण करत घर जाळले

Nandurbar News : महुपाडा गावात रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०२२ मध्ये आनंद तडवी याने भरत खेेमा तडवी खुनाच्या गुन्ह्यात रूमा तडवी याच्या विरोधात जवाब दिला होता

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : तीन वर्षांपूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांना जबाब दिला. विरोधात जबाब दिल्याचा राग मनात धरून जमावाने साक्षीदाराच्या घरावर हल्ला करत घर जाळून टाकले. इतकेच नाही तर दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात येणाऱ्या महुपाडा गावात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून गरीब कुटुंब उघड्यावर आले आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील महुपाडा या गावात रात्रीच्या सुमारास हि धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०२२ मध्ये आनंद तडवी याने भरत खेेमा तडवी याच्या खुनाच्या गुन्ह्यात रूमा तडवी याच्या विरोधात पोलीस ठाण्यात जवाब दिला होता. त्याचा राग मनात धरून जमावाने साक्षीदाराचा घरावर हल्ला केला. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा बदला घेण्याच्या विचारातून तडवी याने भयानक कृत्य केले आहे. 

मारहाण करत घराला लावली आग 

तडवी याने मनात राग धरत जमावाला सोबत घेत साक्षीदाराच्या घरावर रात्रीच्या सुमारास हल्ला केला. इतकेच नाही तर साक्षीदार विलास आणि आनंद यांना जबर मारहाण करत त्यांचा घराला आग लावली. यावेळी कुटुंबीय कसेतरी बाहेर पडत बाहेर निघाले. यात त्यांनी आपला वीज वाचविला आहे. दरम्यान आगीत मोठे नुकसान झाले असून कुटूंब बेघर झाले असून त्यांना खाण्यासाठी धान्य देखील राहिले नाही. 

सव्वा लाखाचे नुकसान 

आगीमुळे घरातील ज्वारी, तूर, बियाणं, घरगुती साहित्य आणि ७० हजार रुपये जळून खात झाले असून यात एकूण एक लाख २६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान याबाबत धडगाव पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार, मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली

Ganeshotsav 2026 : गणरायाच्या आगमनाने महाराष्ट्र भक्तिमय, मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

Maharashtra News Live Update: सांगलीमध्ये भीषण अपघात, कार वारणा नदीत कोसळली

konkan Fort : घोड्याच्या नालासारखा आकार असलेला किल्ला, रचना पाहून व्हाल थक्क!

Ladki Bahin Yojana: ४ दिवसांत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० जमा होणार, ऑगस्टच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

SCROLL FOR NEXT