Nandurbar Crime Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime: रोडरोमियोंना पोलिसांचा दणका; १७ युवकांवर कारवाईचा बडगा

Nandurbar News : पथक तयार करून टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुद्ध कारवाई करणेबाबतचे आदेश सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : गर्दीच्या ठिकाणी मुलींची किंवा महिलांची छेड काढण्याचे, तसेच रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी जाणाऱ्यांच्या (Crime News) मागून येत दुचाकीच्या सायलेन्सरचा जोरात आवाज करणे, शिवीगाळ करणे आदी प्रकारे टवाळखोरी करणाऱ्या (Nandurbar) नंदुरबार शहर व नंदुरबार तालुक्यातील, तसेच विसरवाडी येथील १७ युवकांवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली. (Live Marathi News)

नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी पोलिस अधीक्षक पाटील यांनी टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुद्ध पोलिस ठाणेस्तरावर महिला पोलिस अधिकारी व महिला अंमलदार यांचे एक पथक तयार करून टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुद्ध (Nandurbar Police) कारवाई करणेबाबतचे आदेश सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नंदुरबार जिल्ह्यात, नंदुरबार शहर पोलिस ठाणे हद्दीतील नेहरू चौक, डी. आर. हायस्कूल परिसरात ८, उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील उड्डाणपूल, सिंधी कॉलनी परिसरात ५, नंदुरबार तालुका पोलिस ठाणे परिसरात २, विसरवाडी पोलिस ठाणे परिसरात २, असे एकूण १७ युवकांवर गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्ये टवाळकी करून मुलींची छेडछाड करणाऱ्या युवकांना तसेच नागरिकांना त्रास देणाऱ्या टवाळखोर युवकांना संबंधित पोलिस ठाण्यात आणून ताकीद देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

Khana Saree Contrast Blouse: लग्नसमारंभासाठी खणाच्या साडीवर सुंदर दिसतील हे ७ ट्रेंडी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाइन्स

Maharashtra Live News Update : सराईत गुन्हेगार टिपू पठाण यांच्यासह सात जणांवर तिसऱ्यांदा मोक्का कारवाई

LPG shortage : देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा, खासदारांना संसदेत चहा-कॉफीही मिळेना, खासदाराच्या दाव्याने खळबळ

Summer Tips : उन्हाळ्यात पुदिना अन् कोथिंबीर जास्त दिवस फ्रेश ठेवण्याच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT