Shahada Crime Saam tv
महाराष्ट्र

Shahada Crime : दुकानातून लांबवीले दोन लाखांचे मोबाईल; शहादा शहरातील मध्यरात्रीची घटना

Nandurbar News : नंदुरबार शहरासह परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. रात्रीच्यावेळी सुमसाम परिसर पाहून चोरटे हात साफ करत आहेत. असाच प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात घडला आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. यातच शहादा नगरपालिका समोर असलेल्या मोबाईल दुकानातून मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारला असून तब्बल २ लाख ५ हजार रुपयांचे मोबाईल लांबास केले आहेत. चोरी करताना ची संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

नंदुरबार शहरासह परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. रात्रीच्यावेळी सुमसाम परिसर पाहून चोरटे हात साफ करत आहेत. असाच प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात घडला आहे. यात नेहमी वर्दळ असलेल्या या परिसरातील मोबाईल दुकानांमध्ये मध्यरात्री प्रवेश करून मोबाईल लांबवीले आहेत. सकाळी दुकान उघडण्यासाठी गेलेल्या दुकान मालकाच्या हा प्रकार लक्षात आला. 

पोलिसात गुन्हा दाखल 

या घटनेत चोरटयांनी दुकानातून तब्बल २ लाख ५ हजार रुपयांचे मोबाईल लांबवीले आहेत. दरम्यान मोबाईल दुकानदाराच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा शहरात होणाऱ्या वारंवार चोरीच्या घटनेमुळे पोलीस प्रशासनाचा कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

दारात उभी असलेली दुचाकी लंपास
बुलढाणा
: जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दररोज चोरीच्या घटना समोर येत आहेत. खामगाव तालुक्याच्या आंबेटाकळी येथे पंजाब वानखडे यांच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी गावातीलच गौतम वानखडे उर्फ गोटू आणि सोनू महादेव धोटे या दोघांनी रात्रीच्या सुमारास लंपास केली. देऊळगाव साकर्षा येथील पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरतांना दोन्ही चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crispy Corn Bhaji: पावसाळ्यात चहासोबत बनवा खमंग क्रिस्पी कॉर्न भजी; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळणे, कोंडा आणि चिकटपणा टाळायचा? मग घरीच घ्या केसांची अशी काळजी

Steel Tea Strainer: घाणेरडी काळी झालेली चहाची गाळणी मिनिटांत चमकेल! फक्त वापरा 'हा' १ सोपा घरगुती उपाय; दिसेल जादू

Crime News : धक्कादायक! व्यसन न करण्याच्या सल्ल्यावरून भडकला; संतापलेल्या १५ वर्षीय मुलानं क्रूरपणे जीव घेतला

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT