Nandurbar crime Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar crime : महिलेची हत्या करत शीर धडावेगळे करत फेकले धरणात; खांडबाऱ्यातील धक्कादायक घटना

Nandurbar News : घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरु केला आहे. तर परिसरातील नागरिकांनी देखील येथे गर्दी केली होती

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : नवापूर तालुक्यातील पळसी कोरडी प्रकल्पातील धरणात सकाळी एका अज्ञात महिलेचे शीर पिशवीत टाकून फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने खांडबारा परिसर हादरला असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करत पुढील तपासास सुरवात केली आहे. 

मिळालेले माहितीनुसार १२ जूनला सकाळच्या सुमारास काही शेतकरी बैल धुण्यासाठी धरणात गेले होते. (Crime News) यावेळी त्यांना निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत महिलचे धडापासून वेगळे केलेले शीर दिसून आले. या नागरिकांनी सदरची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली आहे. यानंतर घटनास्थळी पोलीस (Police) दाखल झाले असून तपास सुरु केला आहे. तर परिसरातील नागरिकांनी देखील येथे गर्दी केली होती. 

महिलेची हत्या करत शीर कापून धरणात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र ही महिला कोण आहे? कोणत्याही गावाची आहे? (Nandurbar)  महिलेचा खुन कोणी व का केला? या सर्व प्रश्नांची अद्याप उकल झालेली नाही. खांडबारा पोलीस तपास करीत आहे. दरम्यान सदरच्या हत्येने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार मेहतांची मुजोरी संपेना, 'मिरा-भाईंदर ही जैनांची नगरी'

भारतावर संसर्गजन्य कॅन्सरचं संकट, 23 लाख रुग्णांना व्हायरल कॅन्सर

लाडकी बहीण योजनेवर टांगती तलवार? महिलांचं टेंन्शन वाढलं

सुनिल तटकरेंना कोण करतंय टार्गेट? बड्या नेत्याच्या विधानाने राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

ऐन सणासुदीत टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन महागलं; गॅसचा भडका, टोलच्या दरातही वाढ

SCROLL FOR NEXT