Nandurbar Corona Update Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Corona Update: जिल्ह्यात पुन्‍हा कोरोनाचा धोका; सापडले ५ कोरोना पॉझिटीव्‍ह

जिल्ह्यात पुन्‍हा कोरोनाचा धोका; सापडले ५ कोरोना पॉझिटीव्‍ह

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्यात पाच दिवसांत पाच रुग्ण आढळल्याने (Nandurbar News) आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग सक्रिय झाला आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांना देखील (Corona) कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. (Maharashtra News)

देशासह राज्‍यात कोरोनाने पुन्‍हा डोके वर काढले आहे. काही महिन्‍यांपुर्वी कोरोनाची लाट पुन्‍हा येण्याची शक्‍यता वर्तविली होती. मात्र त्‍यावेळी कोरोनाची लाट पसरली नाही. मात्र आता गेल्‍या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटीव्‍ह रूग्ण आढळून येत आहेत. यात नंदुरबार जिल्‍ह्यात देखील मागील पाच दिवसात कोरोना रूग्‍ण आढळून आल्‍याने जिल्‍हा आरोग्‍य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

जिल्‍हा परिषदेतील अधिकारी पॉझिटीव्‍ह

नंदूरबार जिल्हा परिषदेतील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कार्यालयात खळबळ उडाली होती. त्यानंतर, पुन्हा चार रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची डोकेदुखीही वाढली आहे. त्यामुळे कोरोना चाचणी वाढवणे गरजेचे झाले आहे. तर दुसरीकडे तापमान बदलत असल्याने मोठ्या प्रमाणावर सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण अधिक रुग्णालयात येत आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनावर मात करण्यासाठी अधिक तयारी करून ठेवली आहे. मात्र रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT