Aslod Village SaamTV
महाराष्ट्र

Nandurbar News : लाडक्या बहिणींच्या लढ्याला यश! असलोदमध्ये दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान, आडव्या बाटलीला 612 मतं

Asalod Village नंदुरबार जिल्ह्यातील असलोद गावात आज दारूबंदी विरोधात झालेल्या मतदानात गावकरी महिला आणि सामाजिक संघटनांच्या लढ्याला यश आलं आहे.

Saam Tv

सागर निकवाडे,

नंदुरबार : शहादा तालुक्यातील असलोद येथे दारूबंदीसाठी उभारण्यात आलेल्या लढ्याला अखेर यश आलं आहे. दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर झालेल्या मतदान प्रक्रियेत महिलांचा विजय झाला असून आता गावात दारूबंदी होणार असल्याचं निश्चित झालं आहे. अवैध व्यवसायांच्या विरोधात झालेल्या या विजयानंतर गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला.

असलोद येथे 2012 पासून दारूबंदीसाठी महिलांचं आंदोलन सुरू आहे. गावकरी, महिला आणि सामाजिक संघटनांनी हा लढा उभारला होतं. दारूमुळे अनेक कुटुंबात कलह निर्माण होत आहे. तर गावातील तरुण व्यसनाधीन होत असून अनेकांचे परिवार उध्वस्त झाले. त्यामुळे गावात दारूबंदी करण्यासाठी महिला एकटवल्या. सर्वांनी एकत्र येत मतदानाची मागणी केली होती. अखेर 14 वर्षांनी प्रशासनाने ही मागणी मंजूर केली. त्यानंतर रविवारी गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आलं.

या मतदानाच्या वेळी महिलांचा सहभाग अधिक दिसून आला. रविवारी सकाळपासूनच मतदानासाठी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. दारूबंदीसाठी मतदान घेणारे असलोद हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान गावात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

उभी बाटली, आडवी बाटली चिन्ह

या मतदान प्रक्रियेत उभी बाटली आणि आडवी बाटली अशी दोन चिन्ह होती. 1 हजार 216 महिला मतदारांपैकी 677 महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. या मतमोजणी प्रक्रियेत आडव्या बाटलीला 612 मते मिळाल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी सुरू केलेल्या लढ्याला यश आलं आहे.

Aslod

दरम्यान, निकालानंतर गावातील महिलांनी सांगितले की, आमच्या एकजुटीमुळे व्यसनाने गावातील उध्वस्त होणारे संसार वाचणार असल्याचा आनंद आहे. आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते गावात जल्लोष केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KBC 17: कौन बनेगा करोडपती सीझन १७चा पहिला करोडपती; ७ कोटींच्या कोणत्या प्रश्नाचे दिले उत्तर?

First Metro: जगातील पहिली मेट्रो कधी आणि कुठे सुरू झाली? जाणून घ्या रंजक इतिहास

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

जुना वाद जिवावर उठला! ५ जणांनी अल्पवयीन मुलाच्या अंगावर टेम्पो घातला; रस्त्यावर चिरडून मारलं

Bogus Doctor : बोगस डॉक्टरांचे पितळ उघडे; पदवी नसताना रुग्ण तपासणी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT