Nandurbar Accident New saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident News: ST बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक; भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, परिसरात हळहळ

मोटरसायकल आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नवापूर मोलगी एसटी बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

सागर निकवाडे

Nandurbar News: नंदुरबार तालुक्यातील खामगाव फाट्याजवळ मोटरसायकल आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नवापूर मोलगी एसटी बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

अपघात इतका भीषण होता की दोघे युवक अपघातानंतर रस्त्यावर जोरदार आदळल्याने मोठा प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने निकम वसावे या युवकाच्या जागीच मृत्यू झाला आहे. तर संदीप हा युवक गंभीर जखमी झाला आहे. मोटर सायकल आणि बसची समोरासमोर धडक झाली आहे.

अपघातात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले आहे. गंभीर झालेल्या युवकाला स्थानिक नागरिकांनी मदत कार्य करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघी युवकाची ओळख पटली असून धडगाव तालुक्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी अपघात बघण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

परभणीत ट्रॅव्हल्स-ट्रकची समोरासमोर धडक

ट्रॅव्हल्स-ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना तालुक्यातील पाथरी पोखर्णी महामार्गावरील हमदापुर फाटा येथे घडली. आज सकाळी साडेसहा वाजण्याचा सुमारास ही घटना घडला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून ट्रॅव्हलमध्ये प्रवास करणारे 10 ते 15प्रवासी जखमी झाले आहेत.

एका खाजगी कंपनीची ट्रॅव्हल्स पाथरीवरून पोखर्णी कडे जात होती. तर ट्रक पोखर्णीवरून पाथरी कडे येत होते. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हमदापुर फाटा येथे या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

या धडकेत दोन्ही वाहनांचे चालक व ट्रॅव्हल कॅबिनमध्ये बसलेला एक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे ट्रॅव्हलच्या 10 ते 15 प्रवाशांना दुखापत झाली .जखमी प्रवासी खाजगी वाहनांचा मदतीने परभणी येथे उपचारासाठी नेले असून,मानवत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT