Nandurbar Accident Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident : बस- कारची समोरासमोर धडक; अपघातात मुलीचा मृत्यू, चार जण जखमी

Nandurbar News : अमळनेरहून सुरतच्या दिशेने जाणारी कार भरघाव येत असताना वडदा गावाच्या शिवारात वळणावर कार व समोरून येणारी गुजरात आगाराची बस यांच्यात समोरासमोर जोरदार धडक

साम टिव्ही ब्युरो

विसरवाडी (नंदुरबार) : राज्य परिवहन महामंडळाची बस व कारची सामोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात एका बालिकेचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात (Nandurbar) नंदुरबार- विसरवाडी रस्त्यावर झाला. (Latest Marathi News)

नंदुरबार- विसरवाडी रस्त्यावरील वडदा गावाच्या शिवारात असलेल्या वळण रस्त्यावर कार आणि एसटी बसची (St Bus) समोरासमोर धडक झाली. अमळनेरहून सुरतच्या दिशेने जाणारी कार भरघाव येत असताना वडदा गावाच्या शिवारात वळणावर कार व समोरून येणारी गुजरात आगाराची बस यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. यात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. यामध्ये जिग्निशा रवींद्र जाधव या बालिकेला मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जखमी रुग्णालयात दाखल 

कारमधील चालक रवींद्र रमेश जाधव, पत्नी शैला रवींद्र जाधव, मुलगा भाग्य रवींद्र जाधव, भाची मानसी राजेंद्र पाटील (सर्व रा. गायत्रीनगर, नवागाम, सुरत) गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर सर्व जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलगी जिग्निशा रवींद्र जाधव हिचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. विसरवाडी पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT