Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded Mahadev Temple News: नंदी चक्क दूध पितो; भाविकांचा दावा, व्हिडीओ झाला व्हायरल

Mahadev Temple Nandi News: नंदी चक्क दूध पितो; नांदेडमधील महादेव मंदिरातील प्रकार

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड  : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चाभरा या गावात महादेवाच्या पिंडी समोर असलेला (Nanded) नंदी चक्क दूध पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नंदी दूध (Milk) पित असल्याचा दावा भाविकांनी केला आहे. असे व्हिडीओ यापूर्वी देखील व्हायरल झाले आहेत.

सध्या अधिक श्रावणमास सुरू आहे. या निमित्ताने भाविक महादेवाच्या मंदिरात (shiv Tempal) दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. अर्धापूर तालुक्यातील चाभरा या गावात वडाच्या झाडाखाली महादेवाचे पुरातन मंदिर आहे. येथे नंदी दूध पित असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या मंदिरात मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. दरम्यान एका महिलेने या नंदीला चमच्याने दूध पाजले. 

भाविक करताय दावा 

चमच्यातील दूध या नंदिने पिल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या मंदिरात भाविक हा चमत्कार पाहण्यासाठी मोठी गर्दी करीत आहेत. या महादेवाच्या पिंडी समोरील नंदी चक्क दूध पीत असल्याचा दावा भाविकांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT