नांदेड हादरलं! प्रेमप्रकरणातून तरुणीचा गळा चिरून खून SaamtvNews
महाराष्ट्र

नांदेड हादरलं! प्रेमप्रकरणातून तरुणीचा गळा चिरून खून

गेल्या पाच सहा वर्षांपासून दोघांचे प्रेम संबध होते. मात्र, मध्यंतरी ब्रेकअप झाल्याने वैष्णवीने सुरेशशी असलेले संबध तोडले होते, हे सुरेश ला मान्य नव्हते.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. प्रेम प्रकरणातून हत्या आणि आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढले असून तरुणाईची मानसिकता गंभीर वळणावर असल्याचे यातून दिसून येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना नांदेड मध्ये घडली असून भरदिवसा गळा चिरून तरुणीचा खून करण्यात आला आहे.

हे देखील पहा :

आज दुपारच्या सुमारास हि घटना घडली आहे. नांदेड शहरातील शारदानगर भागात राहणाऱ्या वैष्णवी गौर असं खुन झालेल्या तरुणीचं नाव आहे. तर, सुरेश शेंडगे असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून दोघांचे प्रेम संबध होते. मात्र, मध्यंतरी ब्रेकअप झाल्याने वैष्णवीने सुरेशशी असलेले संबध तोडले होते, हे सुरेश ला मान्य नव्हते.

आरोपीने आज वैष्णवीच्या घरी कुणी ही नसताना घरात घुसून तिचा निघृणपणे चाकूने गळा चिरून खून केला. या खळबळजनक घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी सुरेश शेंडगे विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपी ला अटक देखील केलीय. भरदिवसा घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT