महाराष्ट्र

Nanded Rain News : नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात शिरले पाणी, अनेक ठिकाणी पाणी साचलं

Rain Update : नांदेड शहराजवळ असलेल्या असणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

फय्याज शेख

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात पावसाने आज दिवसभर अक्षरश: झोडपून काढलं आहे. रात्रीही पावसाची संततधार सुरु आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निवासस्थानी देखील पाणी शिरले आहे. अतिवृष्टी पाहता उद्या शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळे (Heavy Rain)  जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नांदेड शहरातील स्नेह नगर परिसरातील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानात देखील पावसाचे पाणी शिरले आहे.

नांदेड शहराजवळ असलेल्या असणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. असणा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Latest News)

हाणेगाव परिसरात ढगफुटीसदृश पाऊस

नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हानेगाव परिसरात आज दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या मुसळधार पावसाने हानेगाव शिवारातील रस्ते जलमय झाले आहेत. ओढे नाले पाण्याने तुडूंब भरून वाहत आहेत. संपूर्ण हानेगाव परिसर हा आजच्या पावसाने जलमय झाला आहे. (Maharashtra News)

आठवडाभर पावसाचं थैमान

नांदेड जिल्ह्यात मागील सहा दिवसात सरासरी २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT