nanded news  Saam tv
महाराष्ट्र

भाजपला सर्वात मोठा झटका; नांदेडमधील एकाच कुटुंबातील ६ भाजप उमेदवारांचा दारुण पराभव, जनतेने घराणेशाही नाकारली

nanded politics : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. एकाच कुटुंबातील ६ उमेदवारांना दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे नांदेडमधील जनतेने घराणेशाही नाकारल्याचं पाहायला मिळत आहे.

Vishal Gangurde

नांदेडच्या लोहामध्ये भाजपला मोठा धक्का

नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील सहा उमेवदारांचा पराभव

लोहा नगरपरिषदेवर शरद पवार गटाने झेंडा फडकावला

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड लोहा नगरपरिषदेत भाजपने उमेदवारी दिलेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांना पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. लोहा नगरपरिषदेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला धूळ चारत दणदणीत विजय मिळवला आहे. नगरपालिकेच्या एकूण १७ जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीच्या विजयाने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

भाजपचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्व सहा उमेदवारांचा पराभव झालाय. त्यामुळे लोह्यात भाजपला पूर्णपणे अपयश स्वीकारावे लागलं आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाची शिवसेना, भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एकच जागा मिळाली आहे. तर राष्ट्रवादीने स्पष्ट बहुमत मिळवत नगरपालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.

नांदेड लोहा नगरपरिषदेच्या या निकालाकडे आमदार चिखलीकर यांच्यासाठी “कही खुशी कही गम” अशा नजरेने पाहिले जात आहे. एकीकडे मतदारसंघातील लोहा नगरपालिका राष्ट्रवादीकडे राखण्यात यश आलं आहे.

कंधारमध्ये पराभव पत्करावा लागल्याने मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लोहा शहरात जल्लोष करत फटाके फोडले, गुलाल उधळला आणि एकमेकांचे अभिनंदन केले.

कोणाकोणाला दिली होती उमेदवारी?

नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. पत्नी गोदावरी गजानन सूर्यवंशी यांना (प्रभाग ७ अ) मधून उमेदवारी देण्यात आली होती. भाऊ सचिन सुभाषराव सूर्यवंशी यांना (प्रभाग क्रमांक १ अ) मधून उमेदवारी देण्यात आली होती. भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी (प्रभाग ८ अ) मधून यांना पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. मेव्हुणा युवराज वसंतराव वाघमारे (प्रभाग क्रमांक ७ ब) मधून उमेदवारी मिळाली होती. तर भाच्याची पत्नी रिना अमोल व्यवहारे (प्रभाग क्रमांक ३) मधून उमेदवारी देण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT