nanded police arrested three in fighting case saam tv
महाराष्ट्र

Crime News: अभिषेकला सावध केल्याने तिघांनी नांदेडात गजेंद्र ठाकूरचा केला खून

पाेलिसांनी शिताफीने प्रकरणाचा तपास करुन संशयित आराेपींना अटक केली.

संतोष जोशी

नांदेड : अनोळखी मृतदेहाची ओळख पटवत नांदेड (nanded) पोलिसांनी (police) खुनाचा छडा लावला आहे. दोन दिवसांपूर्वी नांदेड शहरातील वसरणी परिसरात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या तरुणाची ओळख पटवत या प्रकरणी तिघांना अटक (arrest) केली आहे. (nanded latest marathi news)

गजेंद्र ठाकूर असं खुन झालेल्या तरुणाचं नाव आहे. गजेंद्रला होळीच्या (holi festival) दिवशी पार्टी करण्याचे उद्देशाने बोलावून योगेन्द्र ठाकूर, सुरेंद्र ठाकुर आणि निलेश पेनूरकर या तिघांनी खुन केला.

काही दिवसांपूर्वी सुनिल सुलगेकर या तरुणाचा खून झाला होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी अभिषेक नावाच्या तरुणाचा या तिघांना खुन करायचा होता. त्यासाठी संशयित आरोपींनी गजेंद्रची मदत घेतली. मात्र अभिषेक हा गजेंद्रचा मित्र असल्याने गजेंद्रने अभिषेकला सावध केले. हा राग मनात धरुन संशयित आरोपींनी गजेंद्रचा काटा काढला. गजेंद्रने मित्राला सावध केल्याने गजेंद्रला स्वतः चा जिव गमवावा लागला अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे (local crime branch) पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT