Bear Attack Saam tv
महाराष्ट्र

Bear Attack : अस्वलाच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी; गुरे चार्ट असताना अचानक हल्ला

Nanded News : नांदेडच्या किनवट तालुक्यातील मोहपूर शिंदगी शिवारात सदरची घटना घडली आहे. या घटनेत शंकर आमले (वय २५) हा तरुण जखमी झाला आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : दुपारच्या सुमारास गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर अस्वलाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जखमींची भेट घेऊन त्याला तात्पुरती आर्थिक मदत केली आहे. 

नांदेडच्या (Nanded) किनवट तालुक्यातील मोहपूर शिंदगी शिवारात सदरची घटना घडली आहे. या घटनेत शंकर आमले (वय २५) हा तरुण जखमी झाला आहे. शंकर आमले हा तरुण सकाळी गुरे चारण्यासाठी शेत शिवारात गेला होता. गुरे चरत असल्याने शंकर हा एका ठिकाणी उभा होता. याच वेळी अस्वलाने (Bear Attack) शंकर आमले याच्यावर अचानक हल्ला केला. अस्वलाने हल्ला करत आमले यांच्या डोक्याला व डोळ्याच्या दोन्ही बाजूने जोराचा चावा घेतल्याने चेहरा देखील फाटला आहे. यामुळे आमले गंभीर जखमी झाला.  

वन विभागाची भेट 

आजूबाजूच्या परिसरात घटनेची माहिती मिळाल्यानंतर शंकर आमले या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. तसेच जखमीला तात्पुरत्या स्वरूपाची आर्थिक मदत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT