Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : भावकीतील लोकांकडून मारण्याची धमकी, आरोपाचा व्हिडीओ करत तरुणाने आयुष्य संपवलं!

Nanded News : घटनेबाबत कुटुंबियांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. तसेच याबाबत पोलिसांनी माहिती दिल्यानंतर कुंटूर पोलिस दाखल

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: किरकोळ कारणावरून भावकीच्या लोकांनी शिविगाळ करुन मारण्याची धमकी दिली. असा आरोप करत नांदेडच्या नायगाव तालुक्यातील निळेगव्हाण येथील वीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडीओ केला आहे. 

नायगाव तालुक्यातील निळेगव्हाण येथील श्याम यशवंत जाधव (वय २०) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. (Nanded) या तरुणाने व्हिडीओ तयार करुन आणि धमकी देणाऱ्यांचे नावे घेवून कुष्णूर येथील तलावात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. घटनेबाबत कुटुंबियांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. तसेच याबाबत पोलिसांनी माहिती दिल्यानंतर कुंटूर पोलिस (Police) दाखल होऊन तपास सुरु केला आहे. 

दरम्यान व्हिडिओ करून श्याम जाधव यांनी काही लोकांवर आरोप केले आहेत. मला मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मी मारहाण सहन करू शकत नाही म्हणून जीव द्यायला जात आहे असं व्हिडिओमध्ये त्याने म्हटलं आहे. यामध्ये काही जणांची त्याने नावे घेतली असल्याने पोलिसांकडून त्या दृष्टीने तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT