Kandhar Nagar Parishad Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : नांदेडच्या कंधार शहरात पाणी टंचाई; पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी भाजपचा हंडा मोर्चा

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील कंधार नगर परिषदेकडून शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी लिंबोटी प्रकल्प ते कंधार शहरापर्यंत पाणीपुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कंधार शहराचा मागील सहा दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने कंधार नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. 

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील कंधार नगर परिषदेकडून शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी लिंबोटी प्रकल्प ते कंधार शहरापर्यंत पाणीपुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र कोट्यवधी खर्च करून ही कंधार शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. (Water Scarcity) याबाबत वारंवार नगरपालिकेला निवेदने देऊनही पालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे भाजपचे ऍड. गंगाप्रसाद येनावार यांच्या नेत्रत्वात आज नागरपालिकेवर घागर मोर्चा काढण्यात आला. 

नगर परिषदेसमोर केली अंघोळ 

मागील सहा दिवसांपासून शहरात पाणी पुरवठा न झाल्याने (BJP) भाजपने हंडा मोर्चा काढला आहे. यावेळी कंधार नागरपालिके समोर प्रतिकात्मक स्नान देखील करण्यात आले. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Steel Tea Strainer: घाणेरडी काळी झालेली चहाची गाळणी मिनिटांत चमकेल! फक्त वापरा 'हा' १ सोपा घरगुती उपाय; दिसेल जादू

Crime News : धक्कादायक! व्यसन न करण्याच्या सल्ल्यावरून भडकला; संतापलेल्या १५ वर्षीय मुलानं क्रूरपणे जीव घेतला

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

राज्यातील २० IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, सरकारचा मध्यरात्री आदेश जारी

Petrol News: इथेनॉल मिक्स करूनही E20 हे E10 आणि शुद्ध पेट्रोलपेक्षा स्वस्त का नाही? सरकारने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT