Nanded Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Nanded Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत; वीस वर्षापासून पाण्यासाठी गावकऱ्यांचा संघर्ष सुरूच

Nanded News : एकीकडे मागील दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे अनेक ठिकाणी नदी, नाल्यात पूर आल्याचे पाहण्यास मिळत आहे. परिणामी या भागातील असलेली पाणी टंचाई काही अंशी कमी

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र बनल्या आहेत. मागील वीस वर्षांपासून असलेली पाण्याची समस्या आजही कायम असून हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यातील सिंधी तांडा या गावात पाहण्यास मिळत आहे. यंदा देखील तीच परिस्थिती निर्माण झाली असून आज देखील भीषण पाणीटंचाईचा सामना या गावातील नागरीकांना करावा लागत आहे. 

नांदेडच्या अनेक तालुक्यात आजही पाणीटंचाई कायम आहे. एकीकडे मागील दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे अनेक ठिकाणी नदी, नाल्यात पूर आल्याचे पाहण्यास मिळत आहे. परिणामी या भागातील असलेली पाणीटंचाई काही अंशी कमी झालेली पाहण्यास मिळत आहे. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात आजही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आहे. 

दीड किमी अंतरावर विहिरीतून आणले जातेय पाणी 

नांदेडच्या उमरी तालुक्यातील सिंधी तांडा येथे देखील पाण्याची टंचाई अधिक तीव्र बनली आहे. हंडाभर पाण्यासाठी या तांड्यातील महिला, पुरुष, लहान मुलांना पायपीट करावी लागत आहे. गावापासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून या गावकऱ्यांना पाणी काढताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. ही जीवघेणी कसरत मागील वीस वर्षापासून सुरू असल्याचे येथील गावकऱ्यांनी सांगितले. 

पाणी योजनाही ठरल्या कुचकामी 

गावात पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना आल्या. परंतु त्या योजना कुचकामी ठरल्या आहेत. या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील गावकऱ्यांनी केला आहे. मागील वीस वर्षापासून गावकरी पाण्यासाठी असा हा जीवघेणा संघर्ष करत आहेत. उमरी तालुक्यातील सिंधी तांडा येथील पाणीटंचाईचे कधी मिटणार असाच प्रश्न येथील महिला व पुरुष उपस्थित करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT