Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: मानूरच्या ग्रामस्थांना जायचाय तेलंगणात; का रहायचं नाही महाराष्ट्रात जाणून घ्या कारण

मानूरच्या ग्रामस्थांना जायचाय तेलंगणात; का रहायचं नाही महाराष्ट्रात जाणून घ्या कारण

संतोष जोशी

नांदेड : महाराष्ट्रातील सिमावर्ती भाग असलेले नागरिक तेलंगणा आणि कर्नाटक (Karnataka) जाण्याची इच्छा व्यक्त करण्याचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यात महाराष्ट्र सरकारनेही महाराष्ट्रातील सिमावर्ती भागातील गावांतील नागरिकांच्या समस्यांकडे फारसे गांभीर्याने घेतले नसल्याने नांदेड (Nanded) जिल्‍ह्यातील देगलूर तालुक्यातील मानूर येथील गावकऱ्यांनी तेलंगणात जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. (Tajya Batmya)

देगलूर तालुक्यातील मानूर हे गाव तेलंगणा आणि कर्नाटक सिमेवर आहे. एक किलोमीटर अंतरावर कर्नाटक आणि दिड किलोमिटर अंतरावर तेलंगणा राज्य आहे. महाराष्ट्रापेक्षा दोन्ही राज्यात सोई सुविधा, सरकारी योजना चांगल्या असल्याने मानूरचे ग्रामस्थ तेलंगणात (Talangana) जाण्याची मागणी करत आहेत.

सिमावर्ती भागातील गावांना खरचं महाराष्ट्रापेक्षा तेलंगणा, कर्नाटक राज्य का आवडत आहेत. याचा शोध महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना घेणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात महाराष्ट्रात मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT