Nanded Train Fire News Saam TV
महाराष्ट्र

Nanded Train Fire News: रेल्वे स्थानकातील ट्रेनने अचानक पेट घेतला; उपस्थीतांचा आरडाओरडा अन् धावपळ

Fire News: या रेल्वे गाडीच्या एका डब्याला सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे लोट वाढत गेले. ही बाब त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली.

Ruchika Jadhav

संजय सूर्यवंशी

Nanded:

नांदेडमधून आगीची एक मोठी बातमी समोर आलीये. रेल्वेस्थानकावर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या रिकाम्या रेल्वे गाडीच्या एका डब्याला आग लागली. सकाळी 10 च्या वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नांदेड रेल्वे स्थानकावर प्रत्येक रेल्वेसाठी दुरूस्ती आणि देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. अशात प्लॅटफॉर्म एकवर दुरुस्तीसाठी रेल्वे उभी होती. या रेल्वे गाडीच्या एका डब्याला सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे लोट वाढत गेले. ही बाब त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली.

दुरुस्ती आणि वॉशिंगसाठी याच ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध असल्याने पाईपच्या साह्याने पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. घटनेनंतर हा डबा रेल्वेपासून बाजूला करण्यात आला.

नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात एका हॉटेलला मध्यरात्री भीषण आग

नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या मिशन शाळेच्या प्रवेशद्वारावरील लक्ष्मी टी स्टॉलला मध्यरात्री आग लागल्याने हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर आग कशामुळे लागली हे अद्यापही निष्पन्न झाले नसून, या सर्व घटनेचा तपास पोलीस प्रशासनातर्फे सुरू आहे.

भीषण आगीत हॉटेलमधील पाच ते सहा फ्रिज, खाण्याचे साहित्य, टेबल खुर्च्या यांच्यासह, स्वयंपाक तयार करण्याचे भांडी, आदी साहित्य या भीषण आगीत जळून खाक झाल्याचे दिसून आले. हॉटेल मालक यांच्या म्हणण्यानुसार सुमारे चार ते पाच लक्ष रुपयांचे, हॉटेलमधील मालासह साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT