Nanded News Marriage Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: नाव त्‍याचे चतुर..सुटाबुटात पाहुणा बनून लग्‍नात आला; थक्‍क करणारा केला प्रकार, सीसीटीव्‍हीमध्‍ये झाला कैद

नाव त्‍याचे चतुर..सुटाबुटात पाहुणा बनून लग्‍नात आला; थक्‍क करणारा केला प्रकार, सीसीटीव्‍हीमध्‍ये झाला कैद

संतोष जोशी

नांदेड : पाहुणा बनून सुटाबुटात आला अन्‌ लग्‍न सोहळ्यात सहभागी झाला. सुटबुटातला असल्‍याने हा वधु पक्षाचा की वर पक्षाचा हे कुणालाही समजले नाही. नातेवाईकांनी फेटाही बांधला. परंतु, लग्‍न (Marriage) सोहळ्यात वावरत असताना त्‍याने नवरीच्‍या आईवर नजर ठेवत, असे कृत्‍य केले ही सारेच थक्‍क झाले. हा सर्व प्रकार (CCTV) सीसीटीव्‍ही कॅमेरामध्‍ये कैद झाला आहे. (Breaking Marathi News)

नांदेड शहरातील सांगवी येथील स्वागत मंगल कार्यालयात ही घटना २७ जानेवारीला घडली होती. लग्‍न सोहळ्यातून या सुटाबुटातील पाहुण्याने सहा लाख ७७ हजाराचा ऐवज लंपास केला. बऱ्याच वेळापासून पाळत ठेवलेल्या सुटाबुटात चोराने नवरीच्या आईच्या दागिण्यांची पर्स पळविली. चतुर ढेमरे असं या अट्टल चोराचं नाव आहे. विमानतळ पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चोरट्याचा शोध लावला. सिसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली.

कुठलाच क्राईम रेकॉर्ड नाही तरीही

चतुर ढेमरेला पोलिसांनी सिसीटीव्हीचा आधार घेत शोध लावला. या लग्नसमारंभात वऱ्हाडी मंडळीप्रमाणे वावरत असल्याने त्याच्यावर कुणाचा संशय आला नाही. आत्तापर्यंत ९ ते १० ठिकाणी चोऱ्या केल्याची माहिती विमानतळ पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे या चोराचा पुर्वीचा कुठलाच क्राईम रेकॉर्ड नव्हता. मात्र, पहिल्यांदाच रेकॉर्डवर आलेल्या चोराकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mosquito Agarbatti: डास घालवण्यासाठी अगरबत्ती वापरताय? थांबा, ठरु शकते कुटुंबासाठी विषारी; वाचा रिपोर्ट

Maharashtra News Live Update: उष्णतेमुळे आंबा लवकर पिकू लागल्याने बाजारभावात मोठी घसरण

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींचा लाभ कायमचा बंद; ₹१५०० मिळणार नाही, सरकारने सांगितलं कारण

Sharad Pawar: शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; भाजपमध्ये करणार एन्ट्री

Kandyachi Chutney Recipe : ना परतायची गरज ना भाजायची, फक्त ५ मिनिटांत 'अशी' बनवा कांद्याची झणझणीत चटणी

SCROLL FOR NEXT