Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Fake Medicine : नांदेडला देखील बनावट औषध पुरवठा; १ लाख २८ हजार गोळ्या केल्या सील

Nanded News : नागपूर, ठाणे, वर्धा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातही या बनावट औषधांचा पुरवठा केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता नांदेडच्या रुग्णालयात बनावट औषधीची पुरवठा झाल्याचे समोर आले

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ सरकारी रुग्णालयात बनावट औषधीचा पुरवठा झाल्याचे समोर आल्यानंतर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात देखील बनावट औषधींचा साठा उघड झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वी रुग्णालयात पुरवठा झालेली औषधी लॅबमध्ये तपासणी पाठविण्यात आला असताना त्याचा अहवाल आता प्राप्त झाल्यानंतर हि धक्कादायक बाब समोर आली आहे.   

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयास बनावट औषधींचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंबाजोगाईतच नव्हे तर नागपूर, ठाणे, वर्धा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातही या बनावट औषधांचा पुरवठा केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता नांदेडच्या रुग्णालयात बनावट औषधीची पुरवठा झाल्याचे समोर आले आहे.

सर्व गोळ्या सील

नांदेडच्या रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेले औषध हे शासन मान्य लॅबमध्ये ऑक्टोबर २०२३ मध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या तपासणी अहवालात सदरील गोळ्यांमध्ये योग्य प्रमाणात औषधी नसल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने लागलीच कारवाई करत पुरवठा झालेल्या या औषधींच्या एक लाख २८ हजार गोळ्या सील करत अन्न व औषधी प्रशासनाकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द केल्या आहेत. 

रुग्णावर सकारात्मक परिणाम नाही  

दरम्यान अन्न व औषधी प्रशासनाने अद्यापपर्यंत या प्रकरणात कुठलीही कारवाई केली नसल्याचे दिसून येत आहे. पुरवठा झालेल्या गोळ्यांमध्ये योग्य प्रमाणात औषधी नसल्याने अशा औषधींचे सेवन केल्यावर याचे सकारात्मक परिणाम दिसून येत नाहीत. पण रुग्णाच्या जीवविताला धोका होत नसल्याचं जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT