Sanjay Biyani Case news Latest Updates SAAM TV
महाराष्ट्र

Sanjay Biyani: मोठी बातमी! संजय बियाणी हत्येतील शार्प शूटरला नेपाळ बॉर्डरवरुन अटक

संयज बियाणी यांची हत्या करणाऱ्या शार्पशुटरला अटक करण्यात राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेला यश आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संतोष जोशी, नांदेड

Nanded : नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणात महत्वाची माहिती सध्या समोर येत आहे. संयज बियाणी यांची हत्या करणाऱ्या शार्पशुटरला अटक करण्यात राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेला यश आले आहे. दिपक सुरेश रांगा अस अटक करण्यात आलेल्या शाॅर्पशुटरचे नाव आहे. नेपाळच्या बॉर्डरवरुन दिपक रांगाला ताब्यात घेण्यात आले आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, 5 एप्रिल 2022 रोजी भरदिवसा बियाणींवर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सकाळी 11 वाजताच्या सुमारास संजय बियाणींवर त्यांच्या राहत्या घराबाहेरच चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गोळीबारात संजय बियाणी गंभीर जखमी झाले होते, मात्र रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली होती.

या हत्येचा मास्टरमाइंड हा कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा असलेल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे, मात्र शाॅर्पशुटर फरार होता.

नांदेड पोलीस (Nanded) अनेक दिवसांपासून दिल्ली पंजाब, उत्तर प्रदेशात या दिपकचा शोध घेत होती अखेर या शाॅर्पशुटरला राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. या माहितीला नांदेडच्या स्थानिक पोलीसांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या शाॅर्पशुटर दिपकवर देशभरात 25 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर नेमका कधी चेक करावा? दिवसभरातील 'हा' टाइम सर्वात बेस्ट

Kitchen Hacks : मिक्सर, मसाले अन् डब्यांचा पसारा? 'या' ३ ट्रिक्सने किचन दिसेल चकाचक

SCROLL FOR NEXT