Watermelon Farming Saam tv
महाराष्ट्र

Watermelon Farming : दीड एकरात टरबूजचे विक्रमी उत्पादन; शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग, केरळ राज्यात निर्यात

Nanded News : टरबुज विक्रीतून शेतकरी सागर सालेगाये यांना साधारण सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. कलिंगडाची खरेदी महेबूब शेख या स्थानिक व्यापाऱ्याने केली असून हा माल व्यापाऱ्याने केरळ राज्यात निर्यात

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती परवडत नाही, असे म्हटले जाते आणि पाहण्यास देखील मिळते. परंतु शेतात वेगळा प्रयोग करून शेती करण्यावर अनेक शेतकरी भर देतात. यात यशस्वी देखील होत आहेत. अशाच प्रकारे नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. साधारण दीड एकर क्षेत्रात ५२ टन टरबूजचे उत्पादन घेतले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील एका सुशिक्षित शेतकरी जोडप्याने अवघ्या दीड एकर शेतीत कलिंगडाचे ५२ टन असे इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील शेळगांव छत्री इथल्या सागर दिलीप सालेगाये असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सागर सालेगाये यांना त्यांच्या पत्नीची देखील साथ मिळत आहे. त्यांनी यातून ५२ टन कलिंगडाचे उत्पादन घेतले असून आणखी उत्पादन येण्याची शक्यता आहे. 

सहा लाखांचे उत्पादन 

टरबुज विक्रीतून शेतकरी सागर सालेगाये यांना साधारण सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सालेगाये ह्यांच्या या कलिंगडाची खरेदी महेबूब शेख या स्थानिक व्यापाऱ्याने केली असून हा माल व्यापाऱ्याने केरळ राज्यात निर्यात केला आहे. केरळ राज्यात महाराष्ट्राच्या कलिंगडाला अधिकची मागणी असून तिथे भाव देखील चांगला मिळत असतो. यामुळे सालेगाये यांना कलिंगड उत्पादनातून चांगला फायदा झाला आहे. 

प्रयोग केला यशस्वी 

अनेकजण पारंपरिक शेती करत आले आहेत. मात्र चांगले उत्पादन मिळत नसल्याने नुकसान अधिक होत आहे. सालेगाये या शेतकरी दाम्पत्याने टरबूज लागवडीचा निर्णय घेत प्रयोग यशस्वी केला आहे. दरम्यान नोकरी नाही, व्यवसायाला भांडवल नाही असे रडगाऱ्हाणे न गाता या कुटुंबाने त्या परिस्थितीत शेतीत भरघोस उत्पन्न काढले. त्यामुळे पंचक्रोशीत या जोडप्याचे कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रोज 1 ग्लास ओव्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या यामागचं खरं सत्य

जेवल्यानंतर लगेच शौचाला जावं लागतंय? 'या' आजाराचं असू शकतं लक्षण

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा 24वा हप्ता कधी खात्यात येणार? कॅबिनेट बैठकीतून समोर आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

SCROLL FOR NEXT