Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil News : आरक्षणासाठी सरकारला सद्बुद्धी दे; मनोज जरांगे पाटील यांनी रेणूका मातेला घातले साकडे

Nanded News : उद्यापासुन हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. तेव्हा सरकारने २४ डिसेंबर येऊं देऊ नये. राज्यात ज्या नोंदी सापडल्या त्याचा अहवाल सरकारने स्वीकारावा

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : मनोज जरांगे पाटील यांनी आज नांदेड जिल्ह्यातील माहुर येथील श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले विधीवत पूजा (Nanded) अर्चा करुन जरांगे पाटील यांनी श्री रेणुका मातेची आरती केली. दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची सरकारला सद्बुद्धी दे असे साकडे देवीला घातल्याचे (Manoj Jarange Patil) जरांगे पाटील यांनी सांगितले. (Live Marathi News)

मनोज जरांगे पाटील नांदेड जिल्ह्यात आहेत. या दरम्यान त्यांनी रेणुका मातेचे दर्शन घेतले. आवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना जास्तीची मदत देण्याची सद्बुद्धी दे असे साकडे आईच्या चरणी घातल्याचे जरांगे पाटील म्हणाले. रेणूका मातेचा आशीर्वाद घेउन आम्ही पुन्हा लढायला सज्ज झाल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


दोन दिवसात आरक्षणाचा विषय मार्गी काढावा : जरांगे पाटील
उद्यापासुन हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. तेव्हा सरकारने २४ डिसेंबर येऊं देऊ नये. राज्यात ज्या नोंदी (Maratha Aarkshan) सापडल्या त्याचा अहवाल सरकारने स्वीकारावा आणि या दोन दिवसातच मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढावा अशी सरकारला विनंती आहे. २४ डिसेंबर ही तारीख सरकारने येउ देऊ नये असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला.

मराठे मोठे होउ नये हा भुजबळांचा आकस 
छगन भुजबळ यांचा रोष मराठ्यावर आहे. मराठे मोठे होउ नये हा त्यांचा पूर्वीपासुन आकस आहे. विषारी गरळ ओकने हा त्यांचा पाहिल्यापासुन स्वभाव आहे. मराठ्यांच वाटोळं व्हावं हे त्याचं स्वप्न आहे; परंतु त्याचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, त्याच्याशी खेटायला आम्ही समर्थ आहोत असे जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

SCROLL FOR NEXT