Gharkul Yojana Saam tv
महाराष्ट्र

Gharkul Yojana : कर्ज काढून घरकुलांची कामे: प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाभार्थ्यांचा तिसरा हप्ता थकला

Nanded News : नांदेडच्या माहूर शहरात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत १ हजार ३६७ घरकुलांना २०१७ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. घरकुलांचा लाभ मिळल्याने लाभार्थ्यांनी घरकुलाच्या कामाला देखील सुरुवात केली

Rajesh Sonwane

संजय सुरवंशी 

नांदेड : ग्रामीण भागात घरकुल उभारणीसाठी लाभार्थ्यांना शासनाकडून टप्प्याटप्प्याने हप्ते मिळत असतात. घरकुल मंजुरीनंतर लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता पडत असतो. त्यानुसार हप्ता मिळाल्यानंतर बांधकाम सुरु केल्यानंतर लाभार्थ्यांना तिसरा हप्ता मिळाला नाही. यामुळे काही जणांचे घरकुलाचे काम रखडले आहे. तर काही लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुल बांधकाम पूर्ण केले असल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. 

घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभार्थी निवडले जातात. या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाल्यानंतर त्यांना तीन किंवा चार हप्त्यात रक्कम दिली जात असते. त्यानुसार नांदेडच्या माहूर शहरात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत १ हजार ३६७ घरकुलांना २०१७ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. घरकुलांचा लाभ मिळल्याने लाभार्थ्यांनी घरकुलाच्या कामाला देखील सुरुवात केली. मात्र दोन हप्ते मिळाल्यानंतर तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लाभार्थ्यांना आहे. 

हप्ते थकल्याने कर्ज काढून घरकुल पूर्ण  

दरम्यान १ हजार ३६७ पैकी ८०० घरकुल लाभार्थ्यांनी आपल्या घरकुलांची कामे पूर्ण केली आहेत. या घरकुल लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी कर्ज काढले. या लाभार्थ्यांना दोन हप्ते देखील मिळाले. परंतु तिसरा आणि शेवटचा हप्ता अजून मिळाला नाही. त्यामुळे हे घरकुल लाभार्थी कर्जबाजारी झाले आहेत. तरी देखील प्रशासनाकडून तिसऱ्या हप्त्याची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात टाकण्यात आलेली नाही. 

सहा वर्षांपासून पाठपुरावा 

घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांकडून मागील सहा वर्षापासून हे लाभार्थी माहूर नगरपंचायतीकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाभार्थ्यांना घरकुलाचा हप्ता मिळू शकत नाही. या लाभार्थ्यांना अद्याप एक लाख १० हजार रुपयांचा तिसरा हप्ता मिळाला नसल्याने कर्ज काढून घरकुल पूर्ण केले आहे. परिणामी हे लाभार्थी कर्जबाजारी झाले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT