Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded : गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली; पुराच्या पाण्यात तरुण बुडाला

Nanded News : मराठवाड्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलं

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून नदी- नाले ओसंडून वाहत आहेत. नांदेड जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस झाला होता. मात्र सद्यस्थितीला पाऊस थांबला असला तरी गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर नदीचे पाणी शहरातील खडकपूरा भागात शिरले असून पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. 

राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस सुरु आहे. नांदेड जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस झाला असून पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. तर नदीच्या उगमस्थळी जोरदार पाऊस होत असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

पुराच्या पाण्यात तरुण गेला वाहून  

दरम्यान गोदावरी नदीच्या पुराचे पाणी नांदेड शहरातील खडकपुरा भागात शिरले आहे. तर या भागात आलेल्या पुराच्या पाण्यात एक तरुण बुडाला असून यात त्याचा मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिकांनी तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक नागरिकांना या तरुणाला वाचवण्यात यश मिळाले नाही. मिनाज खान असं या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. 

गोदावरी नदीतील मंदिरात शिरले पाणी 

दरम्यान विष्णुपुरी धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून अडीच लाख क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीला मोठा पूर आल्याने नांदेड शहरातील गोवर्धन घाट मुख्य स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. तसेच गोदावरी नदीकाठच्या मंदिरात देखील पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makhana Ladoo Recipe : एनर्जीचा सुपर डोस, रोज नाश्त्याला खा एक मखाना लाडू

Maharashtra Live News Update: बुलढाणा जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची पोलिसात तक्रार

Shocking : पर्यटनस्थळी फिरायला गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा घात झाला; आमदारी पॉईंटवरून पडून मृत्यू

CIBIL Score: सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी 'या' स्मार्ट टिप्स करा फॉलो, कर्ज मिळेल झटक्यात

Bowel Cancer: पोटदुखी, थकवा की आणखी काही... कॅन्सरची नेमकी लक्षणे कोणती? तज्ज्ञांनी काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT