Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded : महालक्ष्मी सणासाठी आजोबांकडे आली; छतावर गेली असताना घडली दुर्दैवी घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

Nanded News : राधिका बराच वेळ झाली दिसली नसल्याने तिची शोधाशोध केली. तर ती घराच्या गच्चीवर गेल्याचे माहिती झाल्याने घरातील मंडळींनी वरती जाऊन पहिले असता राधिका टाकीत पडल्याचे दिसून आले

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: गौरी गणपतीचे आगमन झाले असताना महालक्ष्मीची स्थापना आजोबांकडे होत असल्याने महालक्ष्मीच्या सणासाठी युवती आजोबांकडे आली होती. दरम्यान हि युवती कामानिमित्ताने छतावर गेली असता येथे असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नांदेडच्या माहूर तालुक्यातील हडसणी येथे घडली आहे. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

किनवट (गोकुंदा) येथील रहिवासी राधिका दिलीप तारमेकवाड (वय १७) असे मृत युवतीचे नाव असून ती महालक्ष्मी सणानिमित्त नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील हडसणी येथे आजोबा विठ्ठल तुकाराम दुर्गेवाड यांच्या घरी आली होती. घरात सण साजरा होत असताना राधिका ही घराच्या दुसऱ्या मजल्यावरील छतावर गेली होती. याठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीत पडली असता तिचा मृत्यू झाल्याचे नातेवाईक यांच्या कडून सांगण्यात आले. 

कुटुंबीयांचा आक्रोश 

दरम्यान राधिका बराच वेळ झाली दिसली नसल्याने तिची शोधाशोध केली. तर ती घराच्या गच्चीवर गेल्याचे माहिती झाल्याने घरातील मंडळींनी वरती जाऊन पहिले असता राधिका टाकीत पडल्याचे दिसून आले. काही वेळानंतर ही घटना उघडकीस आली असता तात्काळ तिला माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नदीत पाय घसरून तरुणाचा मृत्यू

जालना : जालन्यातील बदनापूर तालुक्यातील रोषनगाव येथे लहुकी नदीत पाय घसरून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जिलानी बनाभाई सय्यद (वय २५) असं मृत तरुणाचं नाव आहे. जिलानी सय्यद हा शेतात जात असताना नदी ओलांडत होता. त्यावेळी पाय घसरून तो पाण्यात पडला. गावकऱ्यांनी शोध घेतला त्याला नदीच्या पाण्यातून बाहेर काढले पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूकदार संघटना आक्रमक

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

ठाकरेंचे खासदार शिंदेंकडे का गेले? राज ठाकरेंनी सांगितलं अमित शहा यांचं कनेक्शन

SCROLL FOR NEXT