Girish Mahajan Saam tv
महाराष्ट्र

Girish Mahajan News: बॅनर लावून तेवढ्यापुरते समाधान, आकडा आणा मुख्‍यमंत्री व्‍हा; मंत्री गिरीश महाजन यांचा टोला

बॅनर लावून तेवढ्यापुरते समाधान, आकडा आणा मुख्‍यमंत्री व्‍हा; मंत्री गिरीश महाजन यांचा टोला

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

नांदेड : राज्यात सध्या भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स झळकत आहेत. परंतु, मुख्यमंत्री म्हणून स्वतःचे बोर्ड लावून तेवढ्यापूर्त समाधान करीत आहेत. एकाच पक्षातील चार– चार जण स्पर्धा करीत आहेत. आपली त्याला (Nanded) काही हरकत नाही. मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर १२५ आकडा पाहिजे आणि तो कोणीही आणावा आणि मुख्यमंत्री व्हावं; असा टोला मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी लगावला आहे. (Latest Marathi News)

नांदेड येथे कार्यक्रमानिमित्‍ताने मंत्री गिरीश महाजन आले असता त्‍यांना माध्‍यमांनी भावी मुख्‍यमंत्री बॅनर संदर्भात प्रश्‍न विचारला असता त्‍यांनी प्रतिक्रीया दिली. मंत्री महाजन यांनी राज्‍यातील राजकीय घडामोडींवर देखील संवाद साधला.

सरकार कोसळेल ह्या नुसत्या अफवा

सरकार कोसळेल यावर देखील गिरीष महाजन यांनी टीका केली. (Eknath Shinde) एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य कारभार व्यवस्थित चालू आहे. सरकार कोसळेल ह्या नुसत्या अफवा आहेत. अल्पसंतुष्ट लोक आहेत. काहींना स्वप्न पडायला लागली आहेत. काही स्वप्नात जगत आहेत. आम्ही येऊ आम्ही मुख्यमंत्री होऊ; असे अनेकांना वाटत आहे. पण हे शक्य होणार नाही, असेही मंत्री गिरीष महाजन म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT