Gautami Patil News saam tv
महाराष्ट्र

Gautami Patil Dance Program: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी; अवघ्या 5 मिनिटात कार्यक्रम पडला बंद

Gautami Patil News: महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात गौतमीचे कार्यक्रम होतात.

Shivani Tichkule

संजय सूर्यवंशी

Lavani Dancer Gautami Patil News: प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या आपल्या नृत्याच्या तालावर संपूर्ण महाराष्ट्राला नाचवत आहे. गौतमी आपल्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर ऐवढा चाहतावर्ग वाढला आहे की तिला पाहण्यासाठी तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण गर्दी करतात. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात गौतमीचे कार्यक्रम होतात. (Latest Marathi News)

अशामध्ये काही नांदेड (Nanded) जिल्हयातील धर्माबाद येथे गौतमी पाटील हीच्या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल होत. मात्र या ठिकाणी प्रेक्षकानी प्रचंड गोंधळ घातला. त्यामूळे गोतमीला हा कार्यक्रम अवघ्या पाच मिनिटात बंद करावा लागला.

रात्री नऊच्या सुमारास गौतमी पाटील स्टेजवर आली. त्यापूर्वीच धर्माबादच्या मोंढा मैदानात प्रचंड गर्दी झाली होती. महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. पण गौतमी पाटील येताच तीच्या चाहत्यांनी गोंधळ सूरु केला. स्टेज जवळ देखील मोठी गर्दी झाली. मैदानात खुर्च्यांची मोडतोड आणि धावपळ सूरु झाली.

तेव्हा पोलिसांना (Police) सोम्य लाढीमार करावा लागला. हा गोंधळ पाहून गौतमीने पेक्षकाना शांत राहण्याचे आवाहन देखील केले. पण गोधळ थांबत नसल्याने गोतमीने दहा मिनिटात कार्यक्रम बंद केल. फक्त दीड गाणंवर चाचून ती निघून गेली.

आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याने गौतमीवर सर्वस्थरातून टीका झाली. पण तिने आपल्या अदाकरीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं. बदनामीकडे दुर्लक्ष करत तिने आपल्या नृत्याकडे लक्ष केंद्रीत केले. गौतमीचा 'घुंगरू' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फलटण प्रकरणात तिसरा मोठा दणका जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली

Central Railway Accident : मध्य रेल्वेवर भीषण अपघात; आंदोलनामुळे गर्दी, लोकलमधून पडून ३ प्रवाशांचा मृत्यू

Prajakta Mali Education: जुळून येती रेशीमगाठी फेम मेघना किती शिकलीये?

दोन सिलिंडरचा स्फोट आणि संपूर्ण इमारतीला आग; पाहा VIDEO

गरोदरपणात महिलांचं किती वजन वाढणं नॉर्मल?

SCROLL FOR NEXT