Nanded News Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

पैनगंगा नदीला पुर; दोनशे कुटूंबांचे स्थलांतर

पैनगंगा नदीला पुर; दोनशे कुटूंबांचे स्थलांतर

संतोष जोशी

नांदेड : नांदेड जिल्‍ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर आला आहे. पुरक्षेत्रातील 200 कुटूंबाचे स्थलांतर (Nanded News) करण्यात आले आहे. (nanded news Flood the Panganga river Migration of two hundred families)

मागील तीन– चार दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. या सुरू असलेल्या पावसामुळे नदीत येणारे पाण्याचे प्रमाण लक्षात घेता पैनगंगेचे पाणी किनवटच्या नदीजवळील सखल भागात घुसले आहे. पैनगंगा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. सकाळपासून (Nanded) नांदेड-किनवट हा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झालेला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

नागरीकांना दिले अन्‍नाचे पाकिट

नदीला पुर आल्‍याने परिसरातील दोनशे कुटूंबांचे स्‍थलांतर करण्यात आले आहे. तसेच प्रशासनाकडून या लोकांना अन्नाची पाकिटे आणि इतर व्यवस्था केली जात असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी अधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

SCROLL FOR NEXT