Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded : जिल्ह्यात पुरस्थितीने नुकसान; संतप्त गावकऱ्यांनी पालकमंत्री अतुल सावे यांची अडवली गाडी

Nanded News : मागील रविवारी नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. शिवाय धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जनावरे दगावली. मात्र पालकमंत्री पाहणी करण्यासाठी सात दिवसांनंतर आले

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे जिल्ह्यात शेती पिकांचे प्रचंड नुकसान तसेच वित्त हानी देखील मोठ्या प्रमाणात झाली होती. अशा परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री लंडन दौऱ्यावर होते. सात दिवसानंतर पालकमंत्री अतुल सावे हे आज जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सावे यांची गाडी अडविली. 

नांदेडचे जिल्ह्यातील पूरग्रस्त असलेल्या मुखेड तालुक्यात १७ ऑगस्टच्या मध्यरात्री आलेल्या पुराने मुखेड तालुक्यातील अनेक गावं उध्वस्त झाली आहेत. हसनाळ, रावणगाव ही गावे पूर्णतः या पुरात गाडल्या गेली. हसनाळ येथे पुराच्या पाण्यात पाच जणांचा मृत्यू, तर अनेक जनावरे दगावली आहेत. लेंडी धरणाचे अभियंता तिडके यांनी धरणातून रात्री न सांगता पाणी सोडल्याने ही दुर्घटना घडल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे तिडके यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील गावकऱ्यांनी लावून धरली. 

सात दिवसांनंतर पालकमंत्री पाहणीसाठी दाखल 

पूरग्रस्त भागात मोठे नुकसान झाले असताना गावकऱ्यांना अद्याप मदत न मिळाल्याने गावकरी आक्रमक झाले आहेत. तर पुरस्थितीनंतर तब्बल सात दिवसानंतर लंडनहुन आज पालकमंत्री अतुल सावे पूरग्रस्त मुखेड तालुक्यातील हसनाळ गावात आले होते. अतुल सावे यांच्यासोबत खासदार अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. गावात कुठलीही मदत पोहोचली नाही असा आरोप गावकर यांनी केला आहे.

सावेंची गाडी अडवत केला विरोध 

दरम्यान अनेक नेत्यांचे आणि मंत्र्यांचे या भागात दौरे होत आहेत. परंतु अद्याप ठोस मदत कोणी केली नसल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केला आहे. आज पालकमंत्री अतुल सावे या भागाची पाहणी करण्यासाठी आले असता गावकऱ्यांनी त्यांना विरोध केला. सावे यांच्या गाडीच्या समोर गावकरी उभे राहिले. ग्रामस्थांनी गाडी आडून गावकर यांनी रोष व्यक्त केला. अद्याप मदत न मिळाल्याने गावकरी संतप्त झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT