Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल

Nanded News : मुलीने गळफास घेतल्याचे लक्षात येताच तिला उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: नांदेड शहराजवळच्या सोमेश्वर गावात वास्तव्यास असलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थिनींने गळफास घेत (Nanded) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान तिचा आज मृत्यू (Death) झाला. विद्यार्थिनीने ही आत्महत्या मराठा आरक्षणासाठी केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. (Latest Marathi News)

नांदेड शहराजवळ असलेल्या सोमेश्वर गावामध्ये ही घटना घडली आहे. या मुलीने १६ नोव्हेंबरला सायंकाळी घरात कोणी नसताना गळफास घेतला. मुलीने गळफास घेतल्याचे लक्षात येताच तिला उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान आज सकाळी तिचा मृत्यु झाला. मुलीने आत्महत्या केल्यामुळे परिवाराने एकच आक्रोश केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी  

दरम्यान आत्महत्येपूर्वी मुलीने चिट्टी लिहली असुन, मराठा आरक्षणासाठी तिने आत्महत्या केल्याचा दावा मुलीच्या नातेवाईकानी केला आहे. मात्र मुलीच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलीस तपासात ते समोर येईल. याप्रकरणी अजुन गुन्हा दाखल झाला नाही. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! २ नवी स्थानके लवकरच सुरू होणार; लोकलच्या फेऱ्याही वाढणार

Amravati : अमरावती शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक; मतदार नोंदणीला सुरवात, राजकीय पक्षांची लगबग

Maharashtra Live News Update: नगर मनमाड महामार्गावर गेल्या चार तासांपासून वाहतूक कोंडी

Dussehra History: नवरात्रीनंतर दसरा का साजरा केला जातो?

Neet ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा टोकाचा निर्णय, स्वत:वर गोळी झाडत आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT