Nanded News Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : खेकडे पकडायला गेलेल्या युवकांचा दुर्दैवी मृत्यू; रात्रीच्या अंधारात विद्युत तारेला स्पर्श

खेकडे पकडायला गेलेल्या युवकांचा दुर्दैवी मृत्यू; रात्रीच्या अंधारात विद्युत तारेला स्पर्श

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : रात्री गावाजवळ असलेल्या ओढ्यात खेकडे पकडायला गेलेल्या युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची (Nanded) घटना मुखेड तालुक्यातील सकनूर गावी घडली आहे. विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दोन युवकांचा जागीच (Death) मृत्यू झाला. (Tajya Batmya)

नांदेडच्या मुखेड तालुक्यातील सकणुर या गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. शिवाजी सुरूणवाड आणि संभाजी नागरवाड या युवकांचा मृत्यू झाला आहे. शिवाजी व संभाजी यांच्यासह गावातील दोन युवक रात्रीच्या सुमारास सकनुर गावाच्या ओढ्यात खेकडे पकडण्यासाठी गेले होते. (Electric Shock) ओढ्यात खेकडे पकडण्यापूर्वीच त्या दोघांना मृत्यूने गाठले.   

विद्युत तारेला स्पर्श 

दरम्यान शेतशिवारात डुकरांचा मोठा त्रास आहे. शेतातील पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकऱ्याने रानडुक्करांसाठी तारेत विद्युत प्रवाह सोडला होता. खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या चार पैकी दोन युवकांचा या तारेला स्पर्श झाला आणि यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT