Ashok Chavan saam tv
महाराष्ट्र

Ashok Chavan News: राममंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त अशोक चव्हाणांचे बॅनर; राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

Ram Mandir Inauguration: अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशाचे वादळ सुरू असतानाच शहरात विविध ठिकाणी त्यांचे कोणत्याही पक्षाचे पद आणि चिन्ह नसलेले नावाचे बॅनर झळकत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

Gangappa Pujari

संजय सूर्यवंशी, नांदेड|ता. २१ जानेवारी २०२४

Nanded News:

काँग्रेस पक्षाने श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले असले तरी नांदेडमध्ये मात्र काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाने या सोहळ्याचे बॅनर झळकलेत. एकीकडे अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशाचे वादळ सुरू असतानाच शहरात विविध ठिकाणी त्यांचे कोणत्याही पक्षाचे पद आणि चिन्ह नसलेले नावाचे बॅनर झळकत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते (Congress) अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अशातच आता अशोक चव्हाण यांचे राममंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त नांदेड शहरात (Nanded) झळकलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत.

"रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीता राम, ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान" असा आशय या बॅनरवर आहे. कोणतेही नेते मंडळी सण समारंभाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रोटोकॉलप्रमाणे आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळीचे, स्थानिक पदाधिकारी आणि स्वत:चे नाव, पक्षात असलेले पद, पूर्वी भूषवलेले पद टाकतात.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजप प्रवेशाच्या रंगल्या चर्चा..

मात्र अशोक चव्हाण यांनी लावलेल्या बॅनरवर ना असा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळेच अशोक चव्हाणांचे असे बॅनर्स म्हणजे भाजपा प्रवेशाचे (BJP) अप्रत्यक्ष संकेत आहेत की काय? अशा चर्चांना आता उधान आले आहे. असे बॅनर्स लावण्यामागचा नेमका हेतू तरी काय ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT