ACB Trap Saam tv
महाराष्ट्र

ACB Trap: पाच हजाराची लाच; रेल्वे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

Nanded News : पाच हजाराची लाच; रेल्वे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : वाहनाचे थकीत बिल काढून देण्याच्या मागणीसाठी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. पाच हजाराची (Bribe) लाच स्वीकारताना सीबीआयच्या लाच लूचपत विभागाने एका (Railway) रेल्वे अधिकाऱ्याला अटक केली. एम शिवय्या असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. सीबीआयच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (Tajya Batmya)

नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे रेल्वे विभागात तक्रारदाराने आपले पिकअप वाहन उपलब्ध केले होते. या वाहनासाठी महिन्याला प्रत्येकी वाहनाला ४७ हजार ९९९ भाडे रेल्वे विभागाकडून दिले जाणार होते. मात्र मागील दोन वर्षापासून तक्रारदाराला वाहनाच्या भाड्याची रक्कम मिळाली नव्हती. भाड्याचे थकलेले जवळपास ३४ लाख ५५ हजार ९२८ रुपये बिल झाले होते. थकीत बिल मिळवण्यासाठी तक्रारदाराने इलेट्रिकल विभागातील वरिष्ठ अभियंता एम.शिवय्या यांच्याकडे मागणी केली होती. यावेळी एम. शिवय्या यांनी दहा हजार रुपयाची मागणी केली होती. 

पथकाने रंगेहाथ पकडले 

मागणी केलेल्या रक्कमेत पाच हजार हजार रुपये अगोदर घेतले होते. उर्वरित पाच हजार रकमेसाठी तगादा लावला जातं होता. त्यामुळे तक्रारदाराने ७ सप्टेबरला पुणे येथील (ACB) सीबीआयच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सीबीआयच्या पथकाने सोमवारी सापळा रचला आणि कार्यालयात तक्रारदाराकडून लाचेची उर्वरित रक्कम घेताना अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली. पूर्णा येथील अधिकाऱ्यावर देखील या पथकाने कारवाई केल्याची माहिती आहे. दरम्यान मंगळवारी अधिकाऱ्याला नांदेडच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायलयाने अधिकाऱ्याला १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khan Sir Viral Video: एक दोन नव्हे तर तब्बल १५००० विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या; खान सरांचा हात पाहून अवाक व्हाल

ICICI बँकेचा ग्राहकांना जबर दणका, अर्धा लाख रूपये मिनिमम बॅलेन्स ठेवावा लागणार

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरणार, शिंदेंसेनेची उद्या नाशिकमध्ये बैठक

Crime: बीडमध्ये रक्तरंजित थरार, नशेखोर तरुणाचा कुटुंबीयांवर चाकूहल्ला; आजीचा मृत्यू, आई-वडील गंभीर

Jitendra Awhad: 'बिहार,महाराष्ट्राच्या मतदार याद्या गायब'; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT