Nanded Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Nanded Water Crisis : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नांदेडमध्ये पाणीटंचाईचे संकट; ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट

Nanded News : उन्हाळ्याच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईच्या संकटाने डोकं वर काढलं आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील पोमनाळा या गावात गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: यंदा चांगल्यापैकी पाऊस झाला आहे. या पावसामुळे यंदा पाणी टंचाईची समस्या उद्भवणार नसल्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र राज्यातील काही भागात आतापासूनच पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यात नांदेड जिल्ह्यात देखील पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. प्रामुख्याने भोकर तालुक्यातील पोमनाळ या गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी पायपिट करत जावे लागत आहे. 

मराठवाड्यात दरवर्षीच पाण्याची दाहकता पाहण्यास मिळत असते. त्यानुसार यंदा देखील आतापासूनच पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईच्या संकटाने डोकं वर काढलं आहे. यात नांदेडच्या भोकर तालुक्यातील पोमनाळा या गावात गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. फेब्रुवारी महिन्यातच हि परिस्थिती असल्याने पुढील दोन महिन्यात भीषणता अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

विहिरीवर पाणी भरण्यासाठी गर्दी 

दुचाकी, बैलगाडीवर टाकी बांधून पाणी आणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. गावापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी पाहायला मिळते. जीव धोक्यात घालून वयोवृद्ध महिलांना सुद्धा विहरीवरून पाणी भरावे लागत आहे. दरम्यान विहिरीतील दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे.

दरवर्षीच पाण्याची समस्या 

पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याचे चित्र नांदेड जिल्ह्यात दरवर्षीच अनुभवण्यास मिळते. दर वर्षी नांदेड जिल्ह्यातील मुखेड, लोहा, कंधार या तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होते. तसेच भोकर तालुक्यातील काही भागात देखील उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो. आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईच्या झळा जाणवत असल्याने आगामी दोन महिन्यात देखील हि दाहकता वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT