Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nanded Accident: ह्रदयद्रावक! मोटरसायकल आणि टिप्परचा भीषण अपघात; पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर

पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

Gangappa Pujari

संजय सुर्यवंशी, प्रतिनिधी...

Nanded Accident News: नांदेडमधून एक दुर्देवी अपघाताची घटना समोर आली आहे. नांदेडच्या हदगाव ते तामसा रोड वर मोटारसायकल आणि टिप्परचा भीषण अपघात झाला. यामध्ये पतीचा दुर्देवी मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accident News Marathi)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या (Nanded News) हदगाव ते तामसा रोड वर मोटारसायकल आणि टिप्परच्या धडकेत पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. रामराव सूर्यवंशी असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते हरडफ येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

रामराव सूर्यवंशी हे आपल्या पत्नीसोबत दुचाकीवरून हरडफ येथून हदगावकडे जात होते. त्यांची गाडी तामसा रोडवर भदंत टेकडीजवळ आली असता टिप्परने जोरदार धडक झाली. या धडकेत रामराव सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

नंदुरबारमध्ये भीषण अपघात...

दरम्यान, नंदूरबारमधून एक दुर्देवी अपघाताची घटना समोर आली आहे. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात मजुरांना घेवून जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT