Sand Mafia Saam tv
महाराष्ट्र

Sand Mafia : सिनेस्टाइल थरार; १० किलोमीटर वाळू माफियांचा पाठलाग, अधिकाऱ्यांच्या गाडीसमोर दुचाकी आडवी करत झाले फरार

Nanded News : वाळू माफिया हे प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूची तस्करी करत असतात. अनेकदा कारवाई होऊन देखील थोड्या दिवसांकरिता वाळू वाहतूक बंद राहते. मात्र पुन्हा वाळू तस्करी सुरु केली जात असते

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: अवैध वाळू वाहतूक ही नेहमीचीच डोकेदुखी ठरलेली आहे. कारवाई केल्यानंतर देखील वाळूची तस्करी सुरूच असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात नांदेडच्या माहूर तालुक्यातील अवैध वाळू माफियांविरोधात महसूल प्रशासनाने कंबर कसली आहे. माहूर तालुक्यातील अनमाळ, हडसनी या भागात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. अधिकाऱ्यांनी वाळू माफियांचा पाठलाग केला परंतु वाळू माफिया पळून जाण्यात यशस्वी झाले.

वाळू माफिया हे प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूची तस्करी करत असतात. अनेकदा कारवाई होऊन देखील थोड्या दिवसांकरिता वाळू वाहतूक बंद राहते. मात्र पुन्हा वाळू तस्करी सुरु केली जात असते. हे चित्र राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये पाहण्यास मिळते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात सुरु असलेली वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनी वाळू तस्करांचा पाठलाग केल्यानंतर देखील ते फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. 

१० किलोमीटर पर्यंत पाठलाग 

अधिकारी कारवाई करण्यासाठी गेले असता अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर अधिकाऱ्यांना आढळून आले. यावेळी अधिकाऱ्यांनी या ट्रॅक्टरचा पाठलाग केला. तब्बल १० किलो मीटर अंतरापर्यंत वाळू माफिया आणि अधिकाऱ्यांच्या गाडीचा हा थरार सुरू होता. अखेर अवैध वाळू चोरी करणाऱ्या माफियांनी दुचाकी आडव्या लावत वाळूने भरलेले ट्रॅक्टर तिथून पसार केले. 

वाळू माफियांवर गुन्हे दाखल 

पैनगंगा नदी पत्रातून मोठा प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची बाब लक्षात आल्याने महसूल प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहे. या वाळू माफियांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच आता वाळू तस्करी रोखण्यासाठी वाळू घाटावर प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने रस्ते खोदण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

Anushka Sharma : RCB च्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट; विराटसोबत बेभान होऊन नाचली, मिसेस कोहलींचा आनंद गगनात मावेना | VIDEO

MLC Election : पुण्यात मोठा ट्वीस्ट! भाजप नेत्याला राष्ट्रवादीतून उमेदवारी, ३ तास आधी हातात घड्याळ घेतलं अन्...

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

Political News : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात मोठा विस्तार, ३५ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

SCROLL FOR NEXT