तलाक कायद्यनुसार गुन्हा दाखल 
महाराष्ट्र

नांदेड : 15 लाखांसाठी विवाहितेचा छळ; विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल

पती हा तिचा अधिकच छळ करु लागला. मोबाईलवर संदेश पाठवून मी तुला पैसे आणल्याशिवाय नांदविणार नाही असे म्हणून व्हाटसअपद्वारे तलाक, तलाक, तलाक असे तीन वेळेस उच्चारुन तिला सोडून दिले.

Pralhad Kamble

नांदेड : व्यवसाय करण्यासाठी माहेराहून १५ लाख रुपयांची मागणी करुन एका विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २६) रात्री आठच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nanded- Marital- harassment- for -Rs 15 lakh- Filed- a crime- at- the -vimantal- police- station

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नांदेड शहराच्या साईनगर मेमन फंक्शन हॉल परिसरात राहणाऱ्या एका सव्वीस वर्षीय विवाहितेचा सासरच्या लोकांकडून छळ सुरु होता. यातच तिला माहेराहून व्यवसायासाठी पंधरा लाख रुपये घेऊन ये म्हणून सतत मागणी करु लागले. यातच तिचा शारीरिक व मानसिक छळ वाढत गेला. एवढी रक्कम कुठून आणायची म्हणून सदर विवाहिता ही त्रास सहन करत होती.

हेही वाचा - भिमस्‍मृती यात्रोत्‍सव रद्द; लळींग भुमीवर ३१ जुलैला दरवर्षी होतो उत्‍सव

पती हा तिचा अधिकच छळ करु लागला. मोबाईलवर संदेश पाठवून मी तुला पैसे आणल्याशिवाय नांदविणार नाही असे म्हणून व्हाटसअपद्वारे तलाक, तलाक, तलाक असे तीन वेळेस उच्चारुन तिला सोडून दिले. एवढएच नाही तर तुझा व माझा काही संबंध नाही असे म्हणून तिला शिविगाळ करुन घरातून हाकलून दिले.

पिडीत विवाहिता ही माहेरी आल्यानंतरही तिचा मानसिक छळ सुरुच होता. या सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून तीने इतवारा पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार तिने आपल्या तक्रारीत नमुद केले. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती काझी आबेद सय्यद, सासरा अॅड. सय्यद जावीद काझी, सासु इफत फिरदोस अझा काझी, ननंद राहीन सुरराज सर्व राहणार साईनगर नांदेड हल्ली मुक्काम हिमायतबाग औरंगाबाद यांच्याविरुद्ध भादवीच्या कलम ४९८- अ, ३४ सह कलम ४ मुस्लीम महिला (विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण) कायदा २०१९ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार कृष्णा काळे तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

Happy Birthday Sachin: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT