Nanded Crime News Saam tv news
महाराष्ट्र

Nanded Crime: २० वर्षांपासून बायकोकडून छळ, संयम संपलेल्या नवऱ्याने नदीत उडी मारली, शेवटच्या चिठ्ठीत धक्कादायक माहिती

Domestic Torture: पत्नीच्या सततच्या छळाला कंटाळून नांदेडमध्ये अशोक कांबळे यांनी गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. जीवनरक्षकांनी त्यांचे प्राण वाचवले. चौकशी सुरू आहे.

Bhagyashree Kamble

पत्नीच्या सततच्या जाचाला कंटाळून एका पीडित व्यक्तीने गोदावरी नदीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. नदीजवळील जीवनरक्षक दलाच्या जवानांनी पाहताच त्यांनी त्यांचे प्राण वाचवले. तसेच त्यांना तातडीने शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. ही धक्कादायक घटना नांदेड शहरातील गोवर्धन घाट परिसरातून उघडकीस आली असून, या घटनेनंतर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

अशोक कांबळे असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. २० वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. लग्नाच्या काही वर्षानंतर बायकोने नवऱ्याचा छळ करण्यास सुरूवात केली. बायकोकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळालाल नवरा कटाळला होता. एवढेच नाही तर बायकोने पीडित व्यक्तीचा हात मोडला, तसेच डोळ्याचे नुकसाने केले.

याच त्रासाला कंटाळून अशोकने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. घटनेच्या दिवशी अशोक गोवर्धन घाट पुलावर गेला. नंतर गोदावरी नदी पात्रात उडी घेतली. तसेच आत्महत्येचा प्रयत्न केला. नदी पात्रात कुणीतरी बुडत असल्याचं लक्षात येताच जीवनरक्षक दलाच्या जवानांनी धाव घेतली. तसेच त्याचे प्राण वाचवले.

अशोकची प्रकृती बिघडत असल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली. तपासणीदरम्यान, पोलिसांना अशोकच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीमध्ये त्याने बायकोकडून होणाऱ्या छळाबाबत नमूद केलं आहे.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली असून, पुढील तपास सुरू आहे. पत्नीविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

Fort : किल्ल्यात दडलाय सोन्याचा खजिना? रहस्य शोधण्यासाठी आजही पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT